NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / या खाजगी बँकेत नोकरी करण्याची संधी, मार्चपर्यंत बँक मित्रांची संख्या 25000 करणार

या खाजगी बँकेत नोकरी करण्याची संधी, मार्चपर्यंत बँक मित्रांची संख्या 25000 करणार

देशातील दुर्गम भागात राहणा लोकांना उत्तम बँकिंग सुविधा देण्यासाठी एचडीएफसी बँक (HDFC Bank) मार्चपर्यंत आपल्या बँक मित्रांची संख्या 11,000 वरून 25,000 पर्यंत वाढवणार आहे.

14

ग्रामीण विभागात विस्तार करण्यासाठी खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असणारी एचडीएफसी बँक (HDFC Bank) बँक मित्रांची संख्या या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत 25000 करण्याची योजना बनवत आहे. बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी याबाबत माहिती दिली. सध्या ही संख्या 11000 आहे.

24

एचडीएफसी बँकेच्या कंट्री हेड, गव्हर्मेंट इन्स्टिट्यूशनल बिझनेस अँड स्टार्टअप्स- स्मिता भगत यांनी अशी माहिती दिली आहे, आम्ही सर्व ग्राहकांसाठी तसंच देशातील कानाकोपऱ्यात राहणाऱ्या लोकांना सर्वश्रेष्ठ सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. याअंतर्गतच आम्ही बँक मित्रांची संख्या 11000 वरून 25000 करणार आहोत.

34

त्यांनी असे म्हटले की, ग्राहकांना बँक मित्रांच्या सहाय्याने खाते उघडणे, रक्कम जमा करणे, कर्ज यासंदर्भातील सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. त्यांनी असे म्हटले बँक त्यांच्या बँक मित्रांच्या नेटवर्कच्या विस्तारासाठी सरकारच्या CSC वर देखील लक्ष केंद्रीत करत आहे.

44

बँकेने 2018 मध्ये भारत सरकारच्या सीएससी गव्हर्नन्ससह मिळून दूरच्या भागात विस्तार केला होता. ते म्हणाले की, बँक सीएससीशी संबंधित ग्रामीण स्तरावरील उद्योजकांकडून बँक मित्रांची नेमणूक करते. या कराराअंतर्गत व्यवसाय प्रतिनिधी बिझिनेस फॅसिलिटेटर (बीएफ) म्हणूनही काम करतील ज्यायोगे व्यापारी, तरुण, उद्योजक, शेतकरी आणि महिलांना बँकेकडून कर्ज सुविधा मिळू शकेल.

  • FIRST PUBLISHED :