तुम्ही जर HDFC बँकेचे ग्राहक असाल किंवा तुम्ही लोन घेतलं असेल किंवा घ्यायचा विचार असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.
बँकेनं MCLR दरात वाढ केली आहे. 0.5 वरून बँकेनं 0.15 टक्क्यांवर केलं आहे. जवळपास 10 बेसिस पॉईंटने MCLR मध्ये वाढ करण्यात आली आहे.
HDFC बँकेनं आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार नवे दर 8 मे पासून लागू होणार आहेत. यामुळे होम लोन, कार लोन, पर्सनल लोन महाग होणार आहे. EMI वाढणार आहेत.
MCLR दर वाढल्याने थेट गृहकर्ज आणि कार कर्जाच्या EMI वर परिणाम होईल. आता तुम्ही कर्ज घेतल्यास, तुम्हाला हप्त्याच्या स्वरूपात (EMI) जास्त पैसे द्यावे लागणार आहेत.
HDFC बँकेच्या मते, एका रात्रीसाठी MCLR दर 7.95% वर गेला आहे. त्याच वेळी, हा दर एका महिन्यासाठी 8.10% आणि तीन महिन्यांसाठी 8.40% असेल. सहा महिन्यांसाठी MCLR दर 8.80 टक्के करण्यात आला आहे.
बँकेने केलेली ही वाढ फ्लोटिंग व्याजदरावर लागू होणार आहे. त्याचा निश्चित व्याजदरावर कोणताही परिणाम होत नाही. MCLR हा किमान व्याजदर आहे, ज्याच्या खाली कोणतीही बँक ग्राहकांना कर्ज देत नाही.