मुंबई : सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून आजही फिक्स डिपॉझिटकडे पाहिलं जातं. त्यामुळे बऱ्याचदा आपल्या सेविंगमधील काही रक्कम ही फिक्स डिपॉझिट ठेवण्याकडे कल असतो. अशा ग्राहकांसाठी नव्या वर्षाआधी बँकेनं गुडन्यूज दिली आहे. FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. याचा फायदा ग्राहकांना होणार आहे.
HDFC खासगी बँकेनं ग्राहकांना नव्या वर्षाआधी आनंदाची बातमी दिली आहे. FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. याचा फायदा कुणाला किती मिळणार याची लिस्ट बँकेनं जारी केली आहे.
बँकेनं दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांसाठी 2 ते 5 कोटी रुपयांपर्यंतच्या बल्क एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. नवीन दर 27 डिसेंबर 2022 पासून लागू आहेत. ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंत एफडी मिळू शकतात आणि यासाठी त्यांना जास्तीत जास्त 7.15 टक्के व्याजदर मिळणार आहे.
7 दिवसांपासून ते 29 दिवसांपर्यंतच्या FD साठी - 4.50 टक्के व्याजदर मिळणार आहे. 30 दिवसांपासून ते 45 दिवसांपर्यंतच्या FD साठी - 5.25% व्याजदर मिळणार आहे. 46 दिवसांपासून ते 60 दिवसांपर्यंतच्या FD साठी - 5.50% व्याजदर मिळणार आहे. 61 दिवसांपासून ते 89 दिवसांपर्यंतच्या FD साठी - 5.75% व्याजदर मिळणार आहे.
90 दिवसांपासून ते 6 महिन्यांपर्यंतच्या FD साठी - 6.10% व्याजदर मिळणार आहे. 6 महिन्यांपासून ते 9 महिन्यांपर्यंत FD साठी - 6.35% व्याजदर मिळणार आहे. 9 महिन्यांपासून ते 1 वर्षांपर्यंतच्या FD साठी - 6.50% व्याजदर मिळणार आहे.
1 वर्षापासून ते 15 महिन्यांपर्यंतच्या FD साठी - 6.75% व्याजदर मिळणार आहे. 15 महिन्यांपासून ते 2 वर्षांपर्यंतच्या FD साठी - 7.15% व्याजदर मिळणार आहे. 2 वर्षांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD साठी - 7.00% व्याजदर मिळणार आहे.
बँकेनं 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD रकमेवरही व्याजदर वाढ केली होती. आता 2 कोटींहून अधिक रकमेवर ग्राहकांना व्याजदर वाढ मिळणार आहे. यासंबंधित अधिक माहिती बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरही ग्राहकांना पाहता येणार आहे.