होळीआधी ग्राहकांना एक मोठी गुडन्यूज मिळाली आहे. होमलोन स्वस्त करण्यात आली आहे. बँक ऑफ बडोदा बँक ज्या बँकेचं नाव देशातील सर्वात मोठ्या बँकांच्या लिस्टमध्ये जोडलं जातं अशी ही बँक. या बँकेनं आपल्या ग्राहकांना गुडन्यूज दिली आहे.
बँक ऑफ बडोदाने होम लोनवरील व्याजदरात 40 बेस पॉईंट म्हणजेच 0.40 टक्क्यांनी कपात केली आहे. या कपातीनंतर, बँकेच्या गृह कर्जाचे व्याज दर दर वर्षी 8.50 टक्क्यांवर पोहोचलं आहे.
बँकेने आपल्या एमएसएमई कर्जावरील व्याज दर कमी केले आहेत, जे आता वर्षाकाठी 8.40 टक्के वर सुरू होते. बँकेचे म्हणणे आहे की हे दोन्ही बदल 5 मार्च ते 31 मार्च या कालावधीसाठी लागू असणार आहेत.
नव्याने होमलोन घेणाऱ्या ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. तर ज्यांनी आधीच लोन घेतलं आहे त्यांना देखील वाढत्या महागाईमध्ये थोडा दिलासा मिळाला आहे.
बँकेनं होम लोनवरील प्रोसेसिंग फी माफ केली आहे. याचाच अर्थ आता तुम्हाला यासाठी कोणतेही वेगळे चार्ज द्यावे लागणार नाहीत.
एमएसएमई कर्जासाठी 50 टक्के प्रोसेसिंग फीमध्ये सूट देण्यात आली आहे.
या घोषणेनंतर, बँक ऑफ बडोदा आता गृह कर्जावरील सर्वात स्वस्त क्रेडिट स्कोअर-लिंक्ड व्याज दर देणारी सरकारी बँक बनली आहे.