सोने-चांदीचे दागिने हा भारतीयांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे.
लग्नकार्य, सण, घरातील विशेष कार्यक्रम या निमित्तानं सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. दीर्घकालीन गुंतवणूक म्हणूनही अनेक जणं सोनं खरेदी करतात.
सोनं तसेच चांदीचे दर रोज बदलत असल्यानं ते खरेदी करण्यापूर्वी बाजारातील ताजे दर माहिती असणं आवश्यक आहे.
येत्या काही काळात लग्नसराईचा हंगाम सुरु होणार आहे. त्यामुळे सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा योग्य काळ असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
पुण्यातील सोने-चांदीची बाजारपेठ चांगलीच प्रसिद्ध आहे. राज्यभरातून अनेक ग्राहक इथं खरेदीसाठी येतात.
पुण्यात मंगळवारी सोन्याच्या दरात थोडी घसरण झाली होती. आज (22 फेब्रुवारी) यामध्ये फार फरक पडलेला नाही.
पुण्यात 22 फेब्रुवारी रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 58142 तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 53287 आहे.
एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्यासाठी 5814 तर 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्यासाठी 5328 रुपये मोजावे लागणार आहेत.
पुणे शहरात आजचा चांदीचा दर 71800 रुपये किलो इतका आहे.
पुणे शहरातील हे सोन्याचे सर्वसाधारण दर आहेत. या किंमतीमध्ये ज्वेलरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या आणि अन्य कारणांमुळे बदल होऊ शकतो.