अनेकदा लोक सोने खरेदी करताना रिसेलिंग पॉलिसीकडे लक्ष देत नाहीत. जर तुम्ही सोने खरेदी करत असाल तर सोन्याच्या रिसेलिंग मूल्याची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. म्हणून, दागिने खरेदी करताना, ज्वेलर्सकडून बायबॅक पॉलिसीबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे.
24, 22 आणि 20 कॅरेट सोन्याची किंमत बदलते. त्यानुसार त्यांचे रिसेलिंगचे दर ठरवले जातात. 24 कॅरेट हे सोन्याचे सर्वात शुद्ध स्वरूप असल्याने ते तुम्ही रिसेल केलं तर त्याची किंमत जास्त मिळते.
कमी शुद्धतेचे सोने विकत घेतल्यास ते विकायला गेल्यावर कमी किंमत मिळते. त्याच वेळी, असे सोने तारण ठेवल्यास, तुम्हाला कमी कर्ज मिळेल. कारण वेगवेगळ्या कॅरेटच्या सोन्याच्या किमतीत 25% फरक आहे. याशिवाय तुम्ही KDM मध्ये जर तुम्ही सोनं घेतलं तर ते तारण ठेवताना तुम्हाला कर्जही कमी मिळेल आणि विकायला गेलात तर किंमतही कमी येईल.
खरेदीच्या वेळी सोन्याची नेमकी किंमत जाणून घ्या. यासाठी तुम्ही इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटवर किंमत पाहू शकता.
सोन्याच्या किंमती खरेदी करताना मेकिंग चार्जेसकडे लक्ष द्या. मेकिंग चार्जेस ३-२५ टक्क्यांपर्यंत असते. काही बारीक नक्षीकाम डिझाइन असलेल्या दागिन्यांवर 30 टक्के चार्ज घेतला जातो. त्यामुळे या सगळ्याचं गणित समजून घ्या नाहीतर तुमच्या खिशातील जास्त पैसे जातील.
सोन्याच्या खरेदीवर 3% जीएसटी भरावा लागतो, तसेच सोने विकून झालेल्या नफ्यावर कर भरावा लागतो. सोने खरेदी केल्यानंतर 3 वर्षांच्या आत त्याची विक्री केल्यास शॉर्ट टर्म कॅपिटल गेन द्यावा लागतो. त्याच वेळी, 3 वर्षांनंतर विक्रीवर दीर्घकालीन भांडवली लाभ कर भरावा लागतो. सोन्याच्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यावर आयकरच्या नियमानुसार कर भरावा लागतो.
गोल्ड हॉलमार्किंग सोन्याची शुद्धता दर्शवते एवढंच नाही तर 6 अंकी होलमार्क नसेल तर तो दागिना खरेदी करू नका, तुमची फसवणूक होऊ शकते. दागिना घेताना अल्फा न्यूमरिकल संख्या आहे की नाही ते तपासून पाहा.
अशा परिस्थितीत, सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग प्रिंटिंग तपासणे महत्वाचे आहे. यासाठी बीआयएस केअर हे सरकारी अॅप वापरले जाते. यासाठी बीआयएस केअर हे सरकारी अॅप वापरले जाते.