NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / ATM मधून पैसे नाही चक्क निघतंय सोनं; विश्वास बसत नाही तर पाहा PHOTO

ATM मधून पैसे नाही चक्क निघतंय सोनं; विश्वास बसत नाही तर पाहा PHOTO

ATM मधून सोनं येणार अशी एक यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. हे वाचून तुमचंही डोकं चक्रावलं ना, पण होय असं खरंच घडलं आहे.

18

आतापर्यंत तुम्ही पैशांसाठी ATM चा वापर केल्याचं ऐकलं असेल. ATM मधून पैसेही निघतात हे देखील माहिती असेल. देशात पहिल्यांदाच ATM मधून सोनं येणार अशी एक यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. हे वाचून तुमचंही डोकं चक्रावलं ना, पण होय असं खरंच घडलं आहे.

28

ATM पैसे बाहेर पडताना तुम्ही पाहिले असतील. आता एक सुविधा सुरू करण्यात आली आहे, ज्याद्वारे तुम्हाला एटीएममधून सोनं काढता येणार आहे.

38

खरं तर, तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये पहिलं रिअल टाइम गोल्ड एटीएम बसवण्यात आलं आहे. रिअल टाइम गोल्डच्या या एटीएममधून सोन्याची नाणी काढता येणार आहेत.

48

गोल्डसिक्का प्रायव्हेट लिमिटेड या हैदराबाद येथील कंपनीने ओपनक्युब टेक्नॉलॉजीजच्या मदतीने हे एटीएम तयार केलं आहे.

58

एटीएमद्वारे सोन्याची नाणी खरेदी करण्यासाठी ग्राहक डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा उपयोग करता येणार आहे.

68

सोने खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या गोल्डसिक्काचे सीईओ सी. तरुज यांच्या मते, या एटीएमचा वापर करून लोक 0.5 ग्रॅम ते 100 ग्रॅमपर्यंतची सोन्याची नाणी खरेदी करू शकतात.

78

या एटीएममध्ये सोन्याचे दर लाईव्ह अपडेट होत राहतील. गोल्ड एटीएमची सेवा 24 तास उपलब्ध असणार आहे.

88

तरुज यांच्या म्हणण्यानुसार, पेड्डापल्ली, वारंगल आणि करीमनगरमध्ये सोन्याचे एटीएम उघडण्याचाही कंपनीचा विचार आहे. येत्या दोन वर्षांत संपूर्ण भारतात सुमारे तीन हजार सोन्याचे एटीएम सुरू करण्याचा कंपनीचा मानस आहे.

  • FIRST PUBLISHED :