NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / फंड उभा करण्यासाठी विकताय सोन्याचे दागिने? या गोष्टींचं पालन केलात तरच मिळेल चांगली किंमत

फंड उभा करण्यासाठी विकताय सोन्याचे दागिने? या गोष्टींचं पालन केलात तरच मिळेल चांगली किंमत

Selling Gold Jewellery: तुम्हाला सोन्याच्या दागिन्यांची विक्री करायची असेल तर त्याकरता योग्य सावधगिरी बाळगून हा व्यवहार करणे आवश्यक आहे. काही टिप्स फॉलो केल्यात तर तुम्हाला तुमच्या दागिन्यांसाठी योग्य किंमतही मिळेल

18

Selling Gold Jewellery: तुम्हाला सोन्याच्या दागिन्यांची विक्री करायची असेल तर त्याकरता योग्य सावधगिरी बाळगून हा व्यवहार करणे आवश्यक आहे. काही टिप्स फॉलो केल्यात तर तुम्हाला तुमच्या दागिन्यांसाठी योग्य किंमतही मिळेल

28

अनेकदा असं होतं की पैशांची आवश्यकता असते त्यावेळी तुमच्याकडे असणारे सोन्याचे दागिने कामी येतात. अगदी आपात्कालीन परिस्थितीत पैसे मिळवण्यासाठी (emergency Cash) सोन्याचे दागिने विशेष मदतीचे ठरतात. अनेकजण फंड उभा करण्यासाठी सोन्याचे दागिने विकण्याचा (gold jewellery) पर्याय निवडतात.

38

कोरोना काळात (Coronavirus Pandemic) आर्थिक संकटांचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने अशाप्रकारे वित्तिय अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यावेळी या पद्धतीचा अवलंब करणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. तुम्ही देखील दागिने (Selling Gold jewellery) विकण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या कशाप्रकारे तुम्ही चांगली किंमत मिळवू शकाल

48

योग्य वजन आणि कॅरेट तपासा-दागिन्यांची विक्री करण्याआधी त्याचे वजन आणि कॅरेट (weight and purity of gold) योग्य पद्धतीने तपासणे आवश्यक आहे. अशावेळी दागिन्यांची पावती जर तुमच्याकडे असेल तर ते फायद्याचे ठरेल. जर तुमच्याकडे पावती नसेल किंवा पावतीवर या बाबींचा उल्लेख नसेल तर या बाबी माहित करुन घेणं गरजेचं आहे. तुम्ही कॅरेट तपासणाऱ्या ज्वेलर्सकडे यासंदर्भात संपर्क करू शकता. खात्री पटवून घेण्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा अधिक सराफांकडे याबाबत चौकशी करा

58

दागिन्यांचे हॉलमार्किंग तपासा- तुम्हाला तुमच्याकडे असणाऱ्या दागिन्यांच्या शुद्धतेबद्दल खात्री नसल्यास, तुम्ही कॅरेट मीटर असणाऱ्या सराफाकडे जाऊन त्याबाबत माहिती करुन घेऊ शकता. दागिन्यांचे हॉलमार्किंग (Gold Hallmarking) त्यांची शुद्धता स्थापित करते आणि खरेदीदारास नेहमीच असे दागिने आवडतात. दागदागिने हॉलमार्क केलेले असल्यास दागिने विक्री करणं सोपं जातं कारण हॉलमार्क स्टॅम्पवर कॅरेटचा उल्लेख असतो.

68

योग्य खरेदीदार निवडा- तुम्ही ज्याठिकाणी दागिना खरेदी केला आहे शक्यतो त्याचठिकाणी दागिने विकण्याचा प्रयत्न करा. काही दुकांनांमध्ये असा नियम असतो की त्यांनी विकलेल्या दागिन्यांचीच ते खरेदी करतात.

78

विविध ज्वेलर्सची बातचीत करा- अंतिम किंमतीवर पोहोचण्यापूर्वी, ज्वेलर्स वजनाचे काही टक्के वजा करू शकतात. विक्री करण्यापूर्वी, त्यामुळे विक्रीआधी दागिन्याची तपासणी करा. दागिन्यांची झीज झाली असेल तर एखादा सराफ 20% पर्यंत पैसे कमी करू शकतो. शिवाय दागिने खरेदी करताना तुम्ही घडणावळीसाठी दिलेली पैसे तुम्हाला परत मिळू शकणार नाही. अशावेळी एक-दोन ज्वेलर्सशी बोलल्यानंतरच योग्य ठिकाणी दागिना विकण्याचा निर्णय घ्या

88

काय सांगतात तज्ज्ञ?- जाणकारांच्या मते, जर तुम्ही 10,000 रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे दागिने विकत असाल तर ज्वेलर्स अनेकदा चेकद्वारे पैसे देऊ शकतात. अशावेळी हे सुनिश्चित करणं आवश्यक आहे की ज्वेलर चेकद्वारे देय देण्यास सक्षम आहे की नाही. तसेच अशी कोणतीही दुकानं आणि सोन्याच्या खरेदीदारांपासून सावध रहा जे अनेकदा चुकीचा सल्ला देऊन स्वत: चा फायदा घेतात. म्हणून तुम्ही एखाद्या नामांकित ब्रँडच्या ज्वेलरकडे गेलात तुमचा फायदा होईल

  • FIRST PUBLISHED :