NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / होम लोन लवकर संपवायचं असेल तर 'या' गोष्टी फॉलो करा, पैशांची बचतही होईल

होम लोन लवकर संपवायचं असेल तर 'या' गोष्टी फॉलो करा, पैशांची बचतही होईल

रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ केल्याने सर्वच बँका आपल्या सर्व प्रकारच्या कर्जाचे व्याजदर वाढवत आहेत. त्यामुळे होम लोनचं बोजाही वाढत आहे. त्यामुळे वाढलेल्या व्याजदरामुळे तुम्हीही चिंतेत असाल तर हे ओझे कमी कसं करता येईल याबाबत माहिती घेऊयात.

16

होम लोन घेऊन अनेकजण आपल्या स्वप्नातील घर खरेदी करतात. मात्र रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ केल्याने सर्वच बँका आपल्या सर्व प्रकारच्या कर्जाचे व्याजदर वाढवत आहेत. त्यामुळे होम लोनचं बोजाही वाढत आहे. त्यामुळे वाढलेल्या व्याजदरामुळे तुम्हीही चिंतेत असाल तर हे ओझे कमी कसं करता येईल याबाबत माहिती घेऊयात.

26

प्री-पेमेंट- होम लोनमध्ये तुम्ही प्रीपेमेंटचा पर्याय निवडल्यास तुमचे गृहकर्ज लवकर संपवू शकता. जेव्हा तुमच्याकडे काही रुपयांची बचत होते, तेव्हा तुम्ही त्याचे प्री-पे बँकेला करा. यामुळे तुमची मुद्दल रक्कम कमी होईल आणि याद्वारे तुम्ही कर्जाचा कालावधी किंवा ईएमआय कमी करू शकता. आरबीआयच्या नियमांनुसार, फ्लोटिंग रेट होम लोन घेणार्‍या बँका किंवा एनबीएफसी कोणत्याही वैयक्तिक गृहकर्ज कर्जदाराकडून प्रीपेमेंटसाठी कोणताही दंड आकारू शकत नाहीत.

36

लोन ट्रान्सफर- जर तुम्ही एका बँकेकडून कर्ज घेतले असेल आणि तुम्हाला दिसले की दुसरी बँक तुम्हाला आकर्षक दरात गृहकर्ज देत आहे, तर तुम्ही दुसऱ्या बँकेत तुमचे गृह कर्ज ट्रान्सफर करू शकता. मात्र, हा शेवटचा पर्याय असावा कारण बॅलेन्स ट्रान्सफर आपल्याकडून प्रोसेसिंग फी घेते.

46

ईएमआय जास्त ठेवा- तुमचा पगार वाढला आणि तुम्ही जास्त EMI भरण्याच्या स्थितीत असाल तर तुम्ही तुमचा EMI वाढवावा. याद्वारे तुम्ही कर्जाचा कालावधी कमी करू शकाल. एकदा तुम्ही गृहकर्जाचा कालावधी कमी केला की, तुमच्या कर्जाची एकूण किंमत कमी होईल.

56

कर्जाचा कालावधी जास्त ठेवा - कर्जाची एकूण किंमत तुम्ही किती वर्षे कर्ज घेत आहात यावर अवलंबून असेल. एकीकडे 25 ते 30 वर्षांच्या कर्जामुळे तुमचे मासिक हप्ते कमी होतात आणि तुम्ही अधिक कर्ज घेऊ शकता. दुसरीकडे, जर तुम्ही 10-15 वर्षांचे कर्ज घेतले तर तुम्ही कमी व्याज द्याल आणि तुमचे कर्ज लवकर संपेल.

66

डाउन पेमेंट जास्त करा - बहुतेक बँका मालमत्तेच्या एकूण वॅल्युएशनच्या 75-90 टक्क्यांपर्यंत कर्ज देतात. अशा परिस्थितीत तुम्ही 10-25 टक्के भरून घर खरेदी करू शकता. जर तुमच्याकडे बचत असेल तर तुम्ही कमीत कमी कर्ज घ्यावे. यामुळे तुमच्यावरील कर्जाचा बोजा कमी होईल.

  • FIRST PUBLISHED :