सुरक्षित गुंतवणूक कुठे असेल तर ती म्हणजे FD आहे. लोक डोळे झाकून FD वर विश्वास ठेवतात. दीर्घ मुदतीमध्ये, बहुतेक लोक कमी जोखीम आणि चांगल्या रिटर्नच्या मुदत ठेवींवर विश्वास जास्त ठेवतात. तुम्हाला सुरक्षित गुंतवणुकीसाठी एफडी एक चांगला पर्याय बनू शकतो. सध्या अशा अनेक सरकारी बँका आहेत, ज्या एफडीवर 7% पर्यंत व्याजदर देतात.
सार्वजनिक क्षेत्रातील ही खासगी बँक 599 दिवसात मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 7 टक्के दराने व्याज देत आहे. 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या ठेवींवर तुम्हाला हे व्याज 7 टक्के मिळणार आहे. एफडीचा कालावधी आणि त्यानुसार व्याजाची संपूर्ण माहिती तुम्हाला बँकेच्या वेबसाइटवर सहज मिळेल.
बँक ऑफ इंडिया 'स्टार सुपर ट्रिपल सेव्हन फिक्स्ड डिपॉझिट' या विशेष मुदत ठेवी देत आहे. मर्यादित काळासाठी ग्राहकांना या विशेष मुदत ठेवीवर 7.25 टक्के दराने व्याज मिळत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर 0.50% अधिक म्हणजे 7.75% मिळत आहे. या एफडीचा मॅच्युरिटी पीरियड 777 दिवसांचा आहे.
कॅनरा बँकेने 6 दिवसांसाठी विशेष मुदत ठेव आणली आहे. बँकेच्या या विशेष ठेवीवर सर्वसामान्य ग्राहकांना 7 टक्के दराने व्याज मिळत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर 0.50% अधिक म्हणजे 7.5% इतका आहे.
पंजाब नॅशनल बँकेने 26 ऑक्टोबर रोजी मुदत ठेवीच्या नियमात बदल केल्याचं सांगितलं. त्यानंतर ही बँक 600 दिवसांसाठी गुंतवणुकीसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर 7 टक्के दराने व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर 7.50% आहे.