NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Financial planning: ‘या’ मोठ्या आर्थिक चुका टाळा, नाहीतर आयुष्यातून उठलाच म्हणून समजा

Financial planning: ‘या’ मोठ्या आर्थिक चुका टाळा, नाहीतर आयुष्यातून उठलाच म्हणून समजा

आर्थिक नियोजन तुम्हाला स्पष्टता देतं आणि योग्य आर्थिक निर्णय घेण्यास मदत करतं. आर्थिक नियोजनामध्ये तुम्हाला तुमच्या जीवनातील उद्दिष्टे गाठण्यासाठी किती पैसे कमवावे, त्यापैकी बचत, खर्च आणि गुंतवणूक कशी करायची हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. नवीन वर्षात लोक भविष्यासाठी अनेक संकल्प करतात आणि त्यात त्यांची आर्थिक उद्दिष्टे समाविष्ट करणं खूप महत्वाचं आहे. नवीन वर्षाच्या संकल्पात आर्थिक नियोजन न करणं दीर्घकाळासाठी महागात पडू शकते. आर्थिक योजना बनवताना तुम्ही काय करंवे हे लक्षात ठेवणं जितके महत्त्वाचं आहे, तितकेच तुम्ही काय करू नये, हेही महत्त्वाचं आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला अशा काही आर्थिक चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही मागे सोडू इच्छिता.

15

कोणत्याही विशिष्ट उद्दिष्टाशिवाय गुंतवणूक करणं- लोक सहसा कर लाभ किंवा परतावा वाढवण्याच्या उद्देशानं गुंतवणूक करतात. तथापि, गुंतवणूक करताना विशिष्ट ध्येय निश्चित करणं खूप महत्त्वाचं ठरू शकते.

25

क्रेडिट कार्ड आणि ईएमआय पेमेंटमध्ये डीफॉल्ट- जर तुमची देय तारखेला तुमची पेमेंट चुकली तर ते तुमच्या क्रेडिट स्कोअरवर विपरित परिणाम करते. यामुळे तुम्हाला भविष्यात कर्ज घेणं कठीण होते.

35

कर्ज, बचत आणि गुंतवणूक यांचा समतोल राखण्यात असमर्थता - या तिन्हींचा समतोल साधणं हेही काही वेळा मोठं आव्हान असतं. तुम्ही आधी कर्ज फेडलं पाहिजे. यानंतर काही भाग बचतीसाठी ठेवता येतो. दुसरीकडे या दोन्ही कामांनंतर तुमच्याकडे अतिरिक्त रक्कम शिल्लक असेल तर ती गुंतवा. कर्ज फेडणं हे बचत आणि गुंतवणूकाइतकेच महत्त्वाचं आहे.

45

विम्याला तुमच्या आर्थिक नियोजनापासून दूर ठेवणे - चांगल्या आर्थिक नियोजनामध्ये विमा समाविष्ट असवा. आणीबाणीची परिस्थिती उद्भवली तरीही तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे गाठू शकाल याची खात्री करण्यात विमा तुम्हाला मदत करतो. जीवन विमा घेऊन तुम्ही त्या लोकांचे संरक्षण करू शकता जे तुमच्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहेत.

55

महागाई लक्षात न घेता सेवानिवृत्तीचे नियोजन- महागाईमुळे तुमच्या बचतीचे मूल्य कालांतराने कमी होते. 10 लाख रुपयांचे मूल्य आज जे आहे, ते आजपासून 20 वर्षांनंतर सारखे नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवृत्ती नियोजन करताना वाढती महागाई लक्षात ठेवा आणि त्यानुसार निवृत्ती नियोजनात गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न करा.

  • FIRST PUBLISHED :