NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / शेतकऱ्यांसाठी Good News! वार्षिक 6000 च नाही तर मिळतील दरमहा 3000, वाचा सविस्तर

शेतकऱ्यांसाठी Good News! वार्षिक 6000 च नाही तर मिळतील दरमहा 3000, वाचा सविस्तर

पीएम-शेतकरी सन्मान निधी योजनेच्या (PM-KISAN) खातेधारकांची नोंदणी कोणत्याही कागदपत्रांशिवाय पंतप्रधान शेतकरी मानधन (PM KISAN MANDHAN) या योजनेसाठी होईल. वाचा या योजनेबद्दल सविस्तर

17

नवी दिल्ली, 13 एप्रिल: केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी (Financial Support of Farmers) काही योजना राबवत आहे. यामध्ये प्रामुख्याने पीएम शेतकरी सन्मान निधी योजना (PM-KISAN) आणि पीएम शेतकरी मानधन योजना (PM Kisan Mandhan) यांचा समावेश होतो.

27

जर तुम्ही पीएम-शेतकरी सन्मान निधी योजनेचे खातेधारक असाल तर तुमची नोंदणी कोणत्याही कागदपत्रांशिवाय पंतप्रधान शेतकरी मानधन या योजनेसाठी होईल. एवढेच नव्हे तर या पेन्शन योजनेसाठी तुमचे योगदान देखील सन्मान निधी योजनेच्या पैशातून कापले जाईल. शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये आणि वयाच्या साठाव्या वर्षानंतर दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळेल.

37

मानधन योजनेसाठी वेगळ्या कागदपत्रांची आवश्यकता नाही- तुम्ही जर पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी करताना सर्व योग्य कागदपत्र दिली असतील तर पीएम शेतकरी मानधन योजनेसाठी तुम्हाला वेगळी कागदपत्रे देण्याची आवश्यकता नाही. पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेची वेबसाइट www.pmkisan.gov.in यावर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

47

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. या योजनेअंतर्गत सरकार गरीब शेतकऱ्यांना वर्षात तीन वेळा 2000 रुपये त्यांच्या बँक खात्यावर पाठवले जातात. पण जर शेतकरी कुटुंबातील कुणी आयकर भरत असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच, जर कोणी सरकारी नोकरीत असेल किंवा खासदार-आमदार असेल तर त्यालाही योजनेचा लाभ मिळणार नाही.

57

अधिकाधिक 2400 रुपयांचं योगदान करावं लागेल- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वयाच्या साठाव्या वर्षानंतर निवृत्तीवेतन मिळण्याची व्यवस्था केली आहे. या योजनेमध्ये 18 ते 40 वयोगटातील कोणताही शेतकरी सहभागी होऊ शकतो. वयानुसार यामध्ये योगदान करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला साठाव्या वर्षानंतर दरमहा 3000 रुपये मिळतील.

67

याकरता प्रत्येक शेतकऱ्याच्या वयानुसार, दर महिन्याचं योगदान कमीत कमी 55 ते जास्तीत जास्त 200 रुपये आहे. अर्थात कमीत कमी 660 रुपये वार्षिक तर जास्तीत जास्त 2400 रुपये वार्षिक भरावे लागतील.

77

किसान निवृत्तीवेतन योजनेतील नियमांनुसार, जर एखादा शेतकरी (ज्याची 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन शेती आहे) 18 वर्षे वयाचा असेल तर, त्याला दरमहा 55 किंवा वर्षाकाठी 660 रुपये जमा करावे लागतील. यानंतर वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यावर त्याला दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळेल. सरकारने सर्व वयोगटातील शेतकऱ्यांसाठी निश्चित केलेली रक्कम दरमहा आणि वार्षिक जमा करावी. म्हणजेच, जर आपण 25 वर्षांचे असाल तर आपल्याला या योजनेंतर्गत किती पैसे जमा करावे लागतील, याबद्दल योजनेत माहिती दिली गेली आहे. विशेष म्हणजे आपण या योजनेत जेवढे पैसे जमा कराल, तितकेच सरकारही जमा करेल.

  • FIRST PUBLISHED :