NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / नोकरदारांसाठी मोठी बातमी! नोकरी गेल्यास मिळेल 3 महिन्याच्या पगाराची 50% रक्कम, सरकारची घोषणा

नोकरदारांसाठी मोठी बातमी! नोकरी गेल्यास मिळेल 3 महिन्याच्या पगाराची 50% रक्कम, सरकारची घोषणा

केंद्रीय मंत्री संतोष गंगवार (Santosh Gangwar) यांनी शुक्रवारी अशी माहिती दिली आहे की, ESICच्या ही योजना 'अटल बीमित व्यक्ति कल्याण योजने'अंतर्गत Unemployment Benefitचा लाभ अर्ज करणाऱ्यांना 15 दिवसांच्या आत मिळून जाईल.

17

ESIC बोर्डाने कोरोना व्हायरस संकटकाळात नोकरी गमावणाऱ्या नोकरदार वर्गाला यावर्षी 24 ते 31 डिसेंबरपर्यंत बेरोजगारी बेनिफिट देत दिलासा दिला आहे. या योजनेअंतर्गत आता तीन महिन्याच्या सरासरी पगाराच्या 50 टक्के रक्कम देण्यात येणारआहे.

27

या प्रस्तावाला एम्प्लॉयी स्टेट इन्शूरन्स कॉर्पोरेशन (ESIC) बोर्डाने मंजुरी दिली आहे, ज्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी केंद्रीय मंत्री संतोष गंगवार (Santosh Gangwar) करत होते. त्यांनी अशी माहिती दिली की, बेरोजगारी लाभासाठी ESIC अंतर्गत करण्यात आलेले क्लेम्स 15 दिवसात पूर्ण केले जातील.

37

24 मार्च ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत नोकरी गमावल्यामुळे अनएम्प्लॉयमेंट बेनिफिट म्हणून केंद्र सरकारने सुमारे 4 दशलक्ष औद्योगिक कामगारांना त्यांच्या तीन महिन्यांच्या सरासरी पगाराच्या 50 टक्के देण्याच्या पात्रतेच्या निकषात शिथिलता दिली आहे. याआधी 25 टक्के रक्कम दिली जात होती.

47

गंगवार यांनी अशी माहिती दिली की, नोकरी गेल्याच्या तारखेनंतर 30 दिवसानंतर या रकमेसाठी क्लेम करता येईल. पहिल्यांदा हा कालावधी 90 दिवस होता.

57

त्याचप्रमाणे आता याकरता क्लेम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना नियोक्ता किंवा तुमच्या कंपनीकडे जाण्याची गरज नाही. बैठकीच्या अजेंडानुसार, क्लेम थेट ESIC च्या शाखा कार्यालयामध्ये जमा केला जाऊ शकतो आणि शाखा स्तरावरच त्याचे व्हेरिफिकेशन देखील केले जाईल. यानंतर थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात क्लेमची रक्कम पाठवण्यात येईल. गंगवार यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. (प्रातिनिधीक फोटो)

67

ESIC बोर्डाच्या गुरुवारच्या बैठकीत झालेल्या या निर्णयानुसार जवळपास 40 लाख औद्योगिक कर्मचाऱ्यांचा फायदा होण्याची शक्यता आहे. ही योजना 'अटल बीमित व्यक्ति कल्याण योजने'अंतर्गत येईल.

77

काय आहे ईएसआयसी स्कीम? दर महिना 21 हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी पगार असणारे इंडस्ट्रिअल कर्मचारी या योजनेअंतर्गत येतात. दर महिन्याला त्यांच्या पगारातील एक हिस्सा कापला जातो, जो ESIC च्या मेडिकल बेनिफिट स्वरुपात डिपॉझिट केला जातो. कर्मचाऱ्याच्या पगारातून दर महिन्याला 0.75 टक्के आणि कंपनीकडून 3.25 टक्के असा ESIC जमा होतो.

  • FIRST PUBLISHED :