NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / EPFO : पासबुक पाहण्यात अडचणी, एका SMS वर चेक करा खात्यावरील बॅलन्स

EPFO : पासबुक पाहण्यात अडचणी, एका SMS वर चेक करा खात्यावरील बॅलन्स

EPFO चा सर्व्हर डाऊन असल्याने पासबुक पाहता येत नाही, मात्र तुम्ही एक SMS करून पासबुक बॅलन्स पाहू शकता कसा चेक करायचा इथे पाहा

16

EPFO चा सर्व्हड डाऊन असल्याने अनेक ग्राहकांना आपल्या पासबुकचा बॅलन्स चेक करण्यात अडचणी येत आहे. महिन्याअखेर किंवा मे च्या पहिल्या आठवड्यात EPFO साठी पगारातून पैसे कापले जातील पण ती रक्कम जमा झाली की नाही ते चेक करायचं कसं?

26

ही समस्या सोडवण्यासाठी टीम संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असल्याची माहिती ईपीएफओच्या वतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून सदस्यांना देण्यात आली आहे.

36

पोर्टलवरील ई-पासबुक विभागाची सेवा बंद असताना सदस्य त्यांच्या खात्यातील शिल्लक कशी तपासणार? तर आम्ही तुम्हाला सांगतो की यासाठी इतर अनेक पर्याय दिले आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही पासबुकशी संबंधित माहिती मिळवू शकता.

46

उमंग अॅप डाउनलोड करा आणि तुमच्या खात्यात लॉग इन करा. यानंतर सर्च बारमध्ये 'EPFO' लिहा आणि सर्च ऑप्शनवर क्लिक करा. तिथे तुम्हाला पासबुकचा पर्याय मिळेल त्यावर क्लिक करा. तिथे तुम्हाला UAN आणि OTP अपलोड करायचा आहे. तुम्हाला पासबुकवरील रक्कम दिसेल.

56

तुमच्या पीएफ खात्याची माहिती एसएमएसद्वारेही मिळवू शकता. यासाठी तुम्हाला मोबाईल क्रमांकावरून ७७३८२९९८९९ या नंबरवर एक SMS करायचा आहे. या मेसेजमध्ये EPFOHO UAN ENG लिहून पाठवा. तुम्हाला हिंदीत माहिती हवी असेल, तर तुम्हाला ती EPFOHO UAN HIN लिहून पाठवावी लागेल.

66

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मिस्ड कॉल किंवा एसएमएसद्वारे खात्याची माहिती मिळविण्यासाठी, तुमचा UAN तुमचे बँक खाते, आधार आणि पॅन कार्डशी जोडलेलं असायला हवं, याशिवाय तुमचा फोननंबरही आधारसोबत लिंक असणं आवश्यक आहे.

  • FIRST PUBLISHED :