NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / EPFO Alert! फोन आणि सोशल मीडिया ही चूक करणं पडू शकतं महागात

EPFO Alert! फोन आणि सोशल मीडिया ही चूक करणं पडू शकतं महागात

EPFOनं सोशल मीडियावरून यासंदर्भात ग्राहकांना माहिती दिली आहे.

16

कोरोनाच्या काळात ऑनलाइन फसवणूक वाढवण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. त्यामुळे अशा कठीण काळात आपल्या खात्यावर असलेले पैसे अधिक सुरक्षित राहावेत यासाठी आपण काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. नाहीतर कर्मचारी भविष्य संघटन निधी या संस्थेनं (EPFO) नागरिकांसाठी अलर्ट जारी केला आहे.

26

फोन, सोशल मीडियावर आधार, यूएएन, पॅन, बँक खात्यासंदर्भात वैयक्तीक माहिती विचारली तर सतर्क राहा असं EPSFO कडून सांगण्यात आलं आहे. ईपीएफओने आपल्या वापरकर्त्यांना सांगितले की, जर कोणी तुम्हाला काही काम करण्यासाठी बँकेत पैसे जमा करण्यास सांगत असेल तर सावध रहा. आपल्याला हे करणे कठीण होऊ शकते.

36

ईपीएफओने आपल्या ग्राहकांना फोनवर आधार क्रमांक, पॅन, बँक तपशील संबंधित कोणतीही वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये असं आवाहन EPFO नं केलं आहे. ईपीएफओ पीएफ ग्राहकांना UAN अकाउंट नंबर (यूएएन) क्रमांक कोणालाही न देण्याचं आणि तो गुप्त ठेवण्याचं आवाहन केलं आहे. आपली कोणतीही वैयक्तीक माहिती कोणत्याही सोशल मीडियावरद्वारे शेअर करू नका.

46

EPFOनं आपल्या संकेतस्थळावर आणि ट्विटरवर या संदर्भात ग्राहकांना माहिती दिली आहे. पॅन, मोबाइल नंबर, आधार कार्ड नंबर आणि बँकेशी संबंधित माहिती EPFOमधून फोनवर अथवा SMS द्वारे विचारली जात नाही. अशा बनावट फोन कॉल्सपासून ग्राहकांनी सतर्क राहावं.

56

तुम्हाला कोणत्याही फ्रॉड किंवा फेक मेसेज अथवा कॉलची तक्रार करायची असेल तर Ministry of Labour and Employment च्या सोशल मीडियावर जाऊन तिथे करावी. 1800118005 या EPFOच्या टोल फ्री नंबरवर देखील संपर्क करून तुम्ही तक्रार नोंदवू शकता.

66

EPFO ग्राहक असल्यास आणि आपल्याला काही समस्या असल्यास आपण ट्विटर किंवा फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे संपर्क साधू शकता.

  • FIRST PUBLISHED :