NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / तुमच्या PF खात्यावर हॅकर्सची नजर, आजच आपलं खातं असं करा सिक्युअर

तुमच्या PF खात्यावर हॅकर्सची नजर, आजच आपलं खातं असं करा सिक्युअर

हॅकर्सने उडवली झोप! तुमच्या खात्यातून तर गायब झाला नाही ना Balance, असा चेक करा

17

मुंबई : विजबील, KYC, खात्यातून बॅलन्स वजा होणं अशा सगळ्या ट्रिक्सचा भांडाफोड झाल्यानंतर आता हॅकर्सनी 5G आणि PF खात्याकडे आपली नजर वळवली आहे. लोकांनी कष्टाने कमवलेल्या पैशांवर हॅकर्स डल्ला मारत आहेत. आता त्यासाठी वेगळी युक्ती योजली आहे. तुमचं PF खातं आजच सुरक्षित करा आणि बॅलन्स करा चेक करायचा याबाबत जाणून घ्या.

27

ईपीएफओ सदस्यांनी पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम नियमितपणे तपासावी. उमंग अॅप, एसएमएस, कॉलद्वारे तुम्ही पीएफ बॅलन्स चेक करू शकता. हे तपासत असताना काही गोष्टींची काळजी घ्या. एका व्यक्तीला त्याचा PF बॅलन्स तपासताना ट्रॅक केलं आणि त्याच्या खात्यातून एक लाखहून अधिक रुपयांवर डल्ला मारला.

37

फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार तो इंटरनेटवर ईपीओएफओ फोन नंबर शोधत होता. त्याला एक बनावट फोन नंबर सापडला. या व्यक्तीने त्यावर फोन केला. त्याला एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आलं. त्या अॅपद्वारे पीडित व्यक्तीची सगळी माहिती हॅकर्सला मिळाली आणि खातं काही सेकंदात रिकामं झालं.

47

ऑनलाइन नंबर शोधणं, रॅण्डम लिंकवर क्लीक करणं किंवा PF खात्यासाठी थर्डपार्टी अॅपची मदत घेणं टाळा. त्यामुळे तुमचं फक्त नुकसानच होऊ शकतं. कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला तुमचा OTP शेअर करू नका. तुम्हाला EPFO किंवा PF चा बॅलन्स चेक करायचा असेल तर तुम्ही त्यासाठी अधिकृत संकेतस्थळाची मदत घ्या.

57

UMANG अॅपद्वारेही तुम्ही तुमचा बॅलन्स चेक करू शकता. हे अॅप डाऊनलोड करा. तुमचा UAN आणि OTP दोन्ही अपलोड करा आणि लॉगइन करा. तिथे तुम्हाला तुमचा PF बॅलन्स तपासता येईल.

67

ज्या 'ईपीएफओ'चे यूएएन ईपीएफओकडे नोंदणीकृत आहे, असे 'ईपीएफओ'चे सदस्य यूएएन (युनिव्हर्सल अकाउंट) असलेला त्यांचा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक वापरून 'ईपीएफओएचओ यूएएन इंग' टाइप करून 7738299899 टेक्स्ट मेसेज (एसएमएस) पाठवून आपला पीएफ बॅलन्स तपासू शकतात.

77

ईपीएफओ पोर्टलवर www.epfindia.gov.in जाऊन 'अवर सर्व्हिसेस' ड्रॉपडाऊन मेन्यूअंतर्गत 'फॉर एम्प्लॉइज' या पर्यायावर क्लिक करा. 'मेंबर पासबुक'वर क्लिक करा आणि तुमचा यूएएन आणि पासवर्ड टाका. असं केल्यानंतर तुम्हाला तुमचं पासबुक पाहता येईल. हे लक्षात घेतले जाऊ शकते की ज्या लोकांनी एकापेक्षा जास्त संस्थांमध्ये काम केले आहे त्यांच्याकडे निवडण्यासाठी भिन्न सदस्य आयडी असतील.

  • FIRST PUBLISHED :