NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / डेबिट आणि क्रेडिट कार्डचेही प्रकार, या पैकी तुमच्याकडे कोणतं आहे? जाणून घ्या

डेबिट आणि क्रेडिट कार्डचेही प्रकार, या पैकी तुमच्याकडे कोणतं आहे? जाणून घ्या

बँक आणि तुमच्या उत्पन्ननुसार गरजेनुसार तुम्ही योग्य ते कार्ड निवडू शकता. तुम्हाला हे कार्डचे प्रकार माहिती आहेत का?

18

डेबिट आणि क्रेडिट कार्ड घेतलं की झालं असं नाही. तर त्याचेही अनेक प्रकार आहेत. बँक आणि तुमच्या उत्पन्ननुसार गरजेनुसार तुम्ही योग्य ते कार्ड निवडू शकता. तुम्हाला हे कार्डचे प्रकार माहिती आहेत का?

28

1. क्लासिक कार्ड- हे एक अतिशय मूलभूत कार्ड आहे. या कार्डवर जगभरातील सर्व प्रकारच्या ग्राहक सेवा उपलब्ध असतील. याशिवाय, तुम्ही हे कार्ड कधीही बदलू शकाल.

38

2. गोल्ड कार्ड- जर तुमच्याकडे गोल्ड व्हिसा कार्ड असेल, तर तुम्हाला ट्रॅव्हल असिस्टन्स, व्हिसाच्या ग्लोबल कस्टमर असिस्टन्स सर्व्हिसेसचा लाभ मिळतो. हे कार्ड जगभरात स्वीकारले जाते. हे कार्ड जागतिक नेटवर्कशी जोडलेले आहे. रिटेल, डायनिंग आणि एंटरटेन्मेंट आउटलेटवर हे कार्ड स्वाइप करून तुम्ही अनेक प्रकारच्या सूट मिळवू शकता.

48

3. प्लॅटिनम कार्ड- या कार्डमधून तुम्हाला पैसे काढता येतात. ग्लोबल नेटवर्कमध्ये देखील तुम्ही हे कार्ड वापरू शकता. या कार्डवर अनेक डील, डिस्काउंट ऑफर आणि इतर सुविधा ग्राहकांना मिळतात.

58

4. टायटॅनियम कार्ड- टायटॅनियम कार्डमधील क्रेडिट मर्यादा प्लॅटिनम कार्डपेक्षा जास्त आहे. हे सामान्यतः चांगला क्रेडिट स्कोअर आणि जास्त उत्पन्न असलेल्या ग्राहकांना बँकेकडून दिलं जातं.

68

5. सिग्नेचर कार्ड- विमानतळ लाउंज प्रवेशासह इतर अनेक सेवासिग्नेचर कार्डमध्ये दिल्या जातात.

78

मास्टरकार्डचेही तीन प्रकार आहेत. World Debit MasterCard, Standard Debit Card, Enhanced Debit Card. तुम्ही बँकेत खातं उघडलं तर तुम्हाला Standard Debit Card मिळतं.

88

RuPay Card मध्येही तीन प्रकार आहेत. Classic, Platinum आणि Select Card. डेबिट आणि क्रेडिट कार्ड या तीनपैकी ग्राहकांना त्यांच्या गरजा आणि उत्पन्न पाहून दिलं जातं.

  • FIRST PUBLISHED :