बहुतेक बँका आणि कंपन्या व्यक्तीच्या पगारावर क्रेडिट कार्ड मर्यादा निश्चित करतात. जर तुमचा पगार पूर्वीपेक्षा जास्त असेल तर तुम्ही तुमची क्रेडिट कार्ड मर्यादा वाढवू शकता.
बँका ग्राहकांच्या क्षमतेनुसार कोणत्याही ग्राहकाची क्रेडिट कार्ड मर्यादा ठरवतात. तुमचं उत्पन्न जितकं जास्त तितकी क्रेडिट मर्यादा जास्त.
बँक केवळ ग्राहकाच्या क्रेडिट स्कोअरच्या आधारावर क्रेडिट मर्यादा वाढवते. क्रेडिट स्कोअर हे दर्शवितो की तुम्ही तुमचे मागील क्रेडिट कार्ड बिल भरलं आहे की नाही. त्यानंतरच बँक तुमची मर्यादा वाढवण्याचा विचार करते.
तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवायची असेल, तर सर्वप्रथम तुम्ही बँक किंवा क्रेडिट कार्ड कंपनीकडे अर्ज करू शकता. तुम्ही हा अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन करू शकता.
बँक तुमचे सर्व तपशील तपासेल. यानंतर, तुमची माहिती योग्य आढळल्यास तुमच्या कार्डची मर्यादा निश्चित केली जाईल. क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवताना हे लक्षात ठेवा की कोणत्याही निरुपयोगी गोष्टींवर पैसे खर्च करू नका. तसेच तुमची जुनी बिलं वेळेवर भरा.