NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / children's day scheme : मुलीचं शिक्षण असो किंवा लग्न टेन्शन नाही, सरकारच्या या योजनेत आजच ठेवा पैसे

children's day scheme : मुलीचं शिक्षण असो किंवा लग्न टेन्शन नाही, सरकारच्या या योजनेत आजच ठेवा पैसे

children's day scheme : आयकरातून सूट आणि बंपर रिटर्न, मुलींसाठी असलेल्या या सरकारी योजना कोणती वाचा सविस्तर

17

जगभरात आज children's day साजरा केला जात आहे. मुलांसाठी हा दिवस खूप खास असतो. मुलांना या दिवसाचं महत्त्व सांगितलं जातं. सरकार मुलींच्या शिक्षणासाठी आणि मुलींना सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणत आहे. तुम्ही अजूनही जर या योजनेचा लाभ घेतला नसेल तर चिल्ड्रन्स डेच्या निमित्तानं आजपासून ही योजना मुलीच्या नावाने सुरू करू शकता.

27

मुलींच्या आर्थिक सुरक्षेसाठी आणि लग्नासाठी म्हणून खास सरकारने सुकन्या समृद्धी योजना आणली आहे. 2014 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. मुलींच्या शिक्षणाच्या खर्चासाठी आणि लग्नासाठी त्यांच्या जन्मापासून थोडी रक्कम या योजनेत जमा केल्यास तिच्या वयाच्या 18 किंवा 21 व्या वर्षी तिला ही रक्कम मिळणार.

37

10 वर्षांचे होईपर्यंत मुलीच्या नावे खाते उघडू शकतात. त्यानंतर खातं उघडता येणार नाही. ज्या पालकांना दोन मुली किंवा तीनपर्यंत जुळ्या मुलींचा दुसरा जन्म किंवा पहिल्या जन्माचा परिणाम तीन मुलींमध्ये होतो. असे पालकही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ही सुविधा बँकेमध्ये उपलब्ध आहे.

47

खातं उघडताना तुम्हाला सुरुवातीला 100 रुपये भरावे लागणार आहत. त्यानंतर तुम्ही 250 रुपयांपासून सुरुवात करू शकता. तुम्ही वर्षाला 150000 रुपयांपर्यंत रक्कम भरू शकता. याची मुदत पालकांना वाढवताही येऊ शकते. खातं उघडल्यापासून 21 वर्षांपर्यंत या खात्यावर पैसे ठेवता येतात.

57

खातं उघडल्यापासून तुम्हाला 15 वर्ष पैसे गुंतवायचे आहेत. जास्तीत जास्त तुम्हाला 21 वर्षांपर्यंत हे खातं सुरू ठेवता येतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयकरातून या योजनेला सूटही देण्यात आली आहे. त्यामुळे कोणताही कर लागत नाही. यावर सध्या 7.1 टक्के व्याज मिळत आहे.

67

शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस खात्यात बाकी असलेली 50% शिल्लक उच्च शिक्षणाच्या उद्देशाने, वयाच्या 18 वर्षानंतर विवाहाच्या उद्देशानं काढता येऊ शकतात.

77

मुलीचं शिक्षण असो किंवा लग्न आता या योजनेमुळे टेन्शन नाही. या योजनेत तुम्ही पैसे गुंतवू शकता. मुलीच्या वयाच्या 18 व्या वर्षी तुम्हाला मिळतील. त्यामुळे तुम्ही जर अजूनही या योजनेत पैसे गुंतवले नसतील तर आजपासून सुरुवात करा.

  • FIRST PUBLISHED :