NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / आजपासून बदलणार तुमच्याशी संबंधित महत्त्वाचे नियम, माहित नसल्यास खिशावर होणार थेट परिणाम

आजपासून बदलणार तुमच्याशी संबंधित महत्त्वाचे नियम, माहित नसल्यास खिशावर होणार थेट परिणाम

आजपासून सामान्यांच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. यामधील काही बदल असे आहेत ज्यांचा तुमच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. जाणून घ्या काय आहेत हे नियम

16

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासून काही महत्त्वाच्या नियमात बदल होत आहेत. यामधील काही बदल असे आहेत ज्यांचा तुमच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. जाणून घ्या कोणते आहेत हे नियम

26

1. गॅस सिलेंडर बुकिंगसाठी द्यावा लागणार ओटीपी- सिलेंडरची डिलिव्हरी घेताना तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी द्यावा लागणार आहे. या नवीन प्रणालीला DAC असे नाव देण्यात आले आहे, म्हणजेच डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (Delivery Authentication Code). आता केवळ सिलेंडर बुक केल्यानंतर तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळणार नाही, तर तुमच्या रजिस्टर्ड फोन क्रमांकावर एक कोड पाठवला जाईल. डिलिव्हरी बॉय तुमच्या सिलेंडरची डिलिव्हरी घेऊन आल्यावर तुम्हाला त्याला हा कोड सांगावा लागेल. त्यानंतरच तुम्हाला तुमच्या एलपीजी गॅस सिलेंडरची डिलिव्हरी दिली जाईल. तेल कंपन्या हा प्रयोग सुरुवातीला 100 स्मार्ट सिटीजमध्ये लागू करणार आहे. त्यानंतर हळूहळू इतर शहरांमध्ये ही प्रणाली लागू केली जाईल

36

2. Indane ने बदलला बुकिंग क्रमांक- तुम्ही जर इंडेनचे ग्राहक असाल तर तुम्ही जुन्या क्रमांकावरून आता एलपीजी गॅसचे बुकिंग करू शकणार नाही. इंडेनने त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर बुकिंगचा नवा क्रमांक पाठवला आहे. याआधी इंडियन ऑइलने अशी माहिती दिली होती की, घरगुती गॅस बुकिंगसाठी देशात वेगवेगळ्या सर्कलसाठी वेगवेगळे मोबाइल क्रमांक आहेत.

46

3. बदलणार एलपीजी गॅसच्या किंमती- प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल मार्केटिंग कंपन्या एलीपीजी सिलेंडरच्या नव्या किंमती जारी करतात. यानुसार किंमती वाढू देखील शकतात किंवा कमी सुद्धा होऊ शकतात. ऑक्टोबरमध्ये तेल मार्केटिंग कंपन्यांनी कमर्शिअल सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली होती.

56

4 . रेल्वेने बदलले वेळापत्रक- भारतीय रेल्वे संपूर्ण देशभरात धावणाऱ्या रेल्वेंचे वेळापत्रक बदलणार आहे. याआधी हे वेळापत्रक 1 ऑक्टोबरपासून बदलणार होते, मात्र आता ही डेडलाइन 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. यानंतर 13 हजार पॅसेंजर्स आणि 7 हजार मालगाड्यांच्या वेळात बदल होणार आहे. 1 नोव्हेंबरपासून देशात धावणाऱ्या 30 राजधान ट्रेन्सच्या वेळा देखील बदलणार आहेत

66

5 SBI बचत खात्यावर मिळेल कमी व्याज आजपासून एसबीआयच्या काही महत्त्वाच्या नियमात बदल करण्यात येणार आहेत. ज्या बचत खात्यामध्ये 1 लाखापर्यंत रक्कम जमा आहे, त्यावर व्याजदर 0.25 टक्क्यांनी कमी होऊन 3.25 टक्के करण्यात आला आहे. तर 1 लाख रुपयांपेक्षा जास्क रकमेवर आता रेपो रेटनुसार व्याज मिळेल.

  • FIRST PUBLISHED :