मुंबई : डिसेंबर महिन्यात ख्रिसमस आणि न्यू ईयर असे दोन मोठे क्षण असतात. तुम्ही या दोन्ही सणांचा फायदा घेऊन नीट प्लॅन करून व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला छप्परफाड कमाई हा एक महिना करून देऊ शकतो. ( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
ख्रिसमस आणि न्यू ईरयसाठी मोठ्या प्रमाणात केक आणि कुकीज, नानकटाई यांची मोठी मागणी असते. केक तर नववर्षाच्या स्वागतासाठी देखील मोठ्या प्रमाणात मागवले जातात. ( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
तुम्ही घरबल्या हा व्यवसाय सुरू करू शकता. प्लम केक, रवा केक यासोबत इतर वेगवेगळ्या केकची मागणी मोठी असते. याशिवाय कुकीज, वेगवेगळ्या प्रकारची बिस्कीटं आणि नानकटाईची मागणी असते. ( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
यासाठी तुम्हाला जागेचा खर्च द्यावा लागणार नाही. तुम्ही घरबसल्या हा व्यवसाय सुरू करू शकता. फक्त त्यासाठी आवश्यक असणारं साहित्य तुम्हाला आणावं लागणार आहे. त्यामधून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. आतापासून तुम्ही व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला ख्रिसमस आणि न्यू ईयरसाठी आधीच मोठ्या प्रमाणात ऑर्डर घेचा येऊ शकतात. ( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
तुमचा बिझनेस प्लॅन लिहून काढा, कोणत्या प्रकारचे कुकी करणार कसा आणि किती खर्च येणार याचा एक आराखडा तयार करा. दुसरं म्हणजे लायसन असणं आवश्यक आहे. त्यासाठी काय प्रक्रिया आहे ते पाहा ते मिळवण्यासाठी प्रयत्न करा. ( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
तुमच्या उत्पादनाला चांगलं लेबल आणि पॅकेजिंग करा. उत्तम पॅकेजिंग असेल तर चांगला खप होतो. ही लोकांची मानसिकता आहे. त्यामुळे तुमची वस्तू कितीही चविष्ट असेल पण पॅकेजिंग चांगलं नसेल ते विकलंही जात नाही. ( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)