NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / कमी भांडवलं अन् जास्त नफा! कुरकुरीत पापडाचा व्यावसाय मिळवून देईल मोठा नफा

कमी भांडवलं अन् जास्त नफा! कुरकुरीत पापडाचा व्यावसाय मिळवून देईल मोठा नफा

पापडाचा उद्योग कसा करायचा? त्यासाठी किती भांडवल असायला हवं? वाचा सविस्तर

16

मुंबई : हा व्यवसाय तर तुम्हाला बक्कळ पैसा कमवून देणारा आहे. थंडी आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये देखील हा व्यवसाय करता येऊ शकतो. अगदी घरातून तुम्ही याची सुरुवात करू शकता. महिलांनी तर हा व्यवसाय बचत गटांतर्फेदेखील करू शकता. याव्यतिरिक्त तुम्ही एकटेही करू शकता.

26

यासाठी सर्वात महत्त्वाची आहे ती चव, तुमच्या पापडाची रेसिपी उत्तम असायला हवी. यासोबत मार्केटिंग आणि पॅकिंग नीट हवं. या गोष्टींकडेही लक्ष द्या. तुम्ही अगदी Whatsapp, फेसबुकच्या मदतीने याची सुरुवात करू शकता. मित्र-मैत्रिणींपासून याची सुरुवात करू शकता.

36

पापडाचेही अनेक प्रकार आहेत. तुम्हाला कोणत्या पापडाचा व्यवसाय करायचा आहे ते आधी ठरवा. त्यानुसार कच्चा माल आणि मशीन काय लागतात याचं बजेट तयार करा.

46

पापडचा व्यवसाय फार खर्च मागत नाही, तर त्यासाठी कष्टाची मागणी होते. तुम्ही तुमच्या गरजेनुसार २००० रुपयांत कच्चा मालही आणू शकता. पण खरा पैसा यंत्रांवर खर्च होतो. यात सर्वात महागडे मशीन पडले तर ते पुलब्लिसर मशीन असते. त्याची किंमत १० हजार रुपयांपासून सुरू होते. जे ५० हजार आणि १ लाखापर्यंतही जाते.

56

इतर यंत्रांची किंमत खूपच कमी आहे. बहुतेकांची किंमत ५००० रुपयांपेक्षा कमी आहे. कमीत कमी खर्चात हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर सुरुवातीला एकूण २० ते २५ हजार रुपये खर्च करता येतील.

66

घरचा व्यवसाय म्हणून पापड मेकिंग करत असाल, तर लायसन्सची गरज नाही. पण जर तुम्ही ते मोठ्या प्रमाणावर करत असाल किंवा तुमचा ब्रँड तयार करायचा असेल तर तुम्हाला एफएसएसएआयकडून लायसन्स घ्यावं लागेल. ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून परवाना शुल्कही फार जास्त नाही.

  • FIRST PUBLISHED :