निखिल स्वामी / बिकानेर : महिन्याला मिळणारा पगार तुटपुंज आणि कामही राबवल्यासारखं मग करायचं काय शेवटी वैतागलेल्या तरुणानं नोकरी सोडली आणि स्वत:चा व्यवसाय सुरु केला. मेहनतीनं त्याला यश मिळालं आणि आज तो पगाराच्या दुप्पट पैसे महिन्याला कमवत आहे. हा तरुण कोण आणि तो असा काय व्यवसाय करतो जाणून घ्या
व्यवसायिक अमित आचार्य हे आधी एका कंपनीत काम करायचे. तिथे त्यांना 20 हजार रुपये पगार मिळायचा. वडील चहा विकातात त्यामुळे व्यवसायातलं बऱ्यापैकी माहिती होती. अखेर विचार करुन काम सोडण्याचा निर्णय घेतला आणि नवीन व्यवसाय सुरू करायचं ठरलं.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने थंडगार लस्सीला मागणी जास्त होती. त्यांनी लस्सी विकायला सुरुवात केली. घरगुती पद्धतीने तयार केलेल्या या लस्सीची हळूहळू मागणी वाढू लागली.
पहाटे 5.30 ते 11.30 या वेळेत लस्सी विकतो. त्याच्याकडे लस्सी पिण्यासाठी तुफान गर्दी असते. लांबून ग्राहक खास त्याच्या हातची लस्सी पिण्यासाठी येतात.
अमित आचार्य म्हणाले की आम्ही स्वत: दुधापासून दही तयार करतो आणि हाताने लस्सी तयार करतो. देशी पद्धतीने ही लस्सी तयार केल्याने त्याची चवही वेगळी लागते. त्यामुळे लोकांनी याला पहिली पसंती दर्शवली आहे.
लस्सी विकून अमित आचार्य जवळपास महिन्याला सध्या लाखभर रुपये कमवत आहे. साधारण लस्सीचा एक ग्लास 30 रुपयांपासून सुरू होतो. 50 रुपयांची देखील स्पेशल लस्सी इथे मिळते.
यासाठी त्यांना साधारण 35 लीटर दुधाचं दही करून त्यापासून लस्सी तयार केली जाते. एवढी सगळी लस्सी ११.३० वाजेपर्यंत संपते असं देखील त्याने सांगितलं आहे. नोकरीपेक्षा त्याला यातून खूप जास्त नफा मिळत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने लस्सीला मागणी अधिक आहे.
यासाठी त्यांना साधारण 35 लीटर दुधाचं दही करून त्यापासून लस्सी तयार केली जाते. एवढी सगळी लस्सी ११.३० वाजेपर्यंत संपते असं देखील त्याने सांगितलं आहे. नोकरीपेक्षा त्याला यातून खूप जास्त नफा मिळत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने लस्सीला मागणी अधिक आहे.
वडील चहा विकतात. त्यांच्याच दुकानाबाहेर बसून अमित हे लस्सी विकत आहेत. दिवसाला साधारण 100 ते 150 लोक त्यांच्याकडे खास लस्सीसाठी येत आहेत. त्यामुळे सध्या या लस्सीची गावातच नाही तर पूर्ण जिल्ह्यात चांगली चर्चा रंगली आहे.