NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / केवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, वाचा काय आहे ऑफर

केवळ 1 रुपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा Hondaची कोणतीही बाइक, वाचा काय आहे ऑफर

जर या दसरा किंवा दिवाळी दरम्यान बाइक खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही ऑफर उत्तम ठरेल

16

सणासुदीचे दिवस सुरू होण्यापूर्वी ऑटो कंपन्या तसेच बँकांनीही त्याचा फायदा घेण्यासाठी ऑफर देण्यास सुरुवात केली आहे. फेडरल बँकेने अशीच एक ऑफर आणली आहे. तुम्ही फक्त एक रुपया देऊन आपल्या घरी बाइक घेऊन येऊ शकता.

26

या ऑफर अंतर्गत तुम्ही हिरो मोटो कॉर्प, होंडा आणि टीव्हीएसच्या पसंतीच्या बाइक खरेदी करू शकता. ही सुविधा देशभरातील 947 शोरूममध्ये उपलब्ध आहे. यासह तुम्हाला पाच टक्के कॅशबॅक देखील मिळेल. तसंच कोणतीही प्रोसेसिंग फी देण्याची देखील गरज नाही

36

बँकेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की ग्राहकांना याकरता बँक शाखेत जाण्याची गरज नाही. डेबिट कार्डवर ईएमआय सुविधा उपलब्ध असेल. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असेल. तुम्ही घरबसल्या देखील ही प्रक्रिया पूर्ण करू शकता

46

फेडरल बँकेने अशी माहिती दिली आहे की, ग्राहक 3, 6, 9 किंवा 12 महिन्यांचा परतफेड कालावधी निवडू शकतात. या योजनेंतर्गत कर्जावर कोणतीही प्रोसेसिंग फी घेतले जाणार नाही. होंडा मोटारसायकलच्या देशभरातील 739 शोरूममध्ये ग्राहक 5 टक्के cashback देखील मिळवू शकतात.

56

यासाठी ग्राहकांना 5676762 या क्रमांकावर एसएमएस किंवा 7812900900 वर मिस कॉल द्यावा लागेल. ईएमआयबाबत देखील या माध्यमातून माहिती मिळवता येईल.

66

फेडरल बँक देशभरातील 36,000 स्टोअरमध्ये डेबिट कार्डवर ईएमआय पेमेंटची सुविधा देते. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स पोर्टलवर खरेदीसाठी बँकेने अलीकडेच ईएमआय सुविधा सुरू केली आहे

  • FIRST PUBLISHED :