NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / इलॉन मस्कचा श्रीमंतीचा मुकुट गेला! 73 वर्षीय उद्योगपतीने मिळवली गादी; कोण आहे बर्नार्ड अरनॉल्ट?

इलॉन मस्कचा श्रीमंतीचा मुकुट गेला! 73 वर्षीय उद्योगपतीने मिळवली गादी; कोण आहे बर्नार्ड अरनॉल्ट?

Bernard Arnault: इलॉन मस्क आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिले नाहीत. बर्नार्ड अरनॉल्ट यांनी ही पदवी घेतली आहे. फ्रेंच बिझनेस टायकून बर्नार्ड अरनॉल्ट यांनी मंगळवारी ब्लूमबर्ग अब्जाधीश इंडेक्समध्ये ट्विटर आणि टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांना मागे टाकले आहे. या यादीत ते पहिल्यांदाच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत.

18

ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, अरनॉल्ट 171 अब्ज डॉलर्ससह जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे, तर मस्क 164 अब्ज डॉलर्ससह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. (चित्र- ट्विटर)

28

बर्नार्ड अरनॉल्ट हे LVMH Moët Hennessy चे CEO आहेत, ही जगातील सर्वात मोठी लक्झरी गुड्स कंपनी आहे. अरनॉल्ट आणि त्याच्या कुटुंबाची LVMH मध्ये 47.5 टक्के हिस्सेदारी आहे. या आलिशान हाऊसकडे सध्या 70 पेक्षा जास्त ब्रँड आहेत. (चित्र- ट्विटर)

38

LVMH म्हणजेच Moët Hennessy Louis Vuitton ही केवळ फ्रान्सचीच नाही तर जगातील सर्वात मोठी लक्झरी गुड्स कंपनी आहे. LVMH च्या 60 पेक्षा जास्त उपकंपन्या आहेत. यामध्ये क्रिस्टिन डायर, फेंडी, मार्क जेकब्स, सेफोरा, टॅग हॉयर, बल्गारी आणि टिफनी अँड कंपनी या ब्रँडचा समावेश आहे. (चित्र- ट्विटर)

48

बर्नार्ड अरनॉल्टची कंपनी वाईन, शॅम्पेन, स्पिरिट, फॅशन आणि चामड्याच्या वस्तू, घड्याळे, दागिने, परफ्यूम आणि सौंदर्यप्रसाधने उत्पादनांच्या व्यवसायात गुंतलेली आहे. त्यांची जगभरात 5500 रिटेल स्टोअर्स आहेत. (चित्र- ट्विटर)

58

अरनॉल्ट यांना त्यांच्या कामाबद्दल खूप आत्मीयता आहे. ते अनेकदा त्यांच्या स्टोअरची तपासणी करतात. जगभरातील कंपनीच्या सर्व स्टोअरला ते भेट देत असतात. (चित्र- ट्विटर)

68

73 वर्षीय अरनॉल्ट यांचा जगातील श्रीमंतांच्या यादीत बऱ्याच काळापासून समावेश आहे. मात्र, ते सार्वजनिक ठिकाणी क्वचितच दिसतात. ते सोशल मीडियावरही सक्रिय नाहीत. (चित्र- ट्विटर)

78

1949 मध्ये फ्रान्समधील रौबेक्स येथे जन्मलेल्या बर्नार्ड अरनॉल्ट यांनी एलीट इंजिनिअरिंग स्कूल पॉलिटेक्निकमधून पदवी प्राप्त केली आहे. 1981 मध्ये अमेरिकेत जाण्यापूर्वी, त्यांनी कौटुंबिक व्यवसाय फेरेट सॅव्हिनेलमध्ये काम केले. जे औद्योगिक उत्पादन करत होते. (चित्र- ट्विटर)

88

बर्नार्ड अरनॉल्ट व्यतिरिक्त, जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत इलॉन मस्क, जेफ बेझोस, बिल गेट्स, वॉरेन बफे आणि मुकेश अंबानी यांच्यासह 10 बड्या उद्योगपतींचा समावेश आहे. (चित्र- ट्विटर)

  • FIRST PUBLISHED :