कार घेण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. तीच गरज ओळखून आता बँक ऑफ महाराष्ट्रने कमी व्याजदरात जास्त कारलोन देणार असल्याचं सांगितलं आहे. बँक ऑफ महाराष्ट्र आता प्रत्येकाचं कार घेण्याचं स्वप्न पूर्ण त्यांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी सज्ज असल्याचं ट्वीट केलं आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं कारलोनसाठी अर्ज करता येतं bankofmaharashtra.in या वेबसाईटवर भेट देऊन तुम्ही कार लोनसाठी अर्ज करू शकता. कार लोनवर तुम्हाला 8.70 टक्के व्याजदर लागणार आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रचे किमान व्याजदर आणि शून्य प्रोसेसिंग फी अशा आकर्षक योजना असलेली आपली आवडती गाडी घेऊन या. आता घरबसल्या ऑनलाइन अर्ज करा असं ट्वीट करत म्हटलं आहे.
कमी हप्ता, जास्त कर्जाची रक्कम, कर्जाचा फॉलोअप घेणं सोपं, मंजूर कार डीलर्स, कोणतेही प्रक्रिया शुल्क नाही, कोणतेही छुपे शुल्क नाही, सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रीपेमेंटवरही शुल्क नाही. त्यामुळे कार घेण्याचा विचार करत असाल तर हे लोन तुम्ही घेऊ शकता.
समजा तुम्ही जर 7 लाखांपर्यंत कार घेतली, 8.70 या इंटरेस्ट रेटनं १ वर्षासाठी तर तुम्हाला महिन्याला 8731 EMI भरावा लागणार आहे. टोटल इंटरेस्ट 4775 आणि एकूण रक्कम वर्षभरात तुम्हाला 104775 एवढी बँकेत जमा करायचीी आहे. हे एक वर्षाच्या हिशोबाने कॅलक्युलेशन केलं आहे.
वैयक्तिक पगारदार कर्मचारी/स्वयंरोजगार व्यावसायिक/उद्योजक/कृषी/कंपन्या आणि कॉर्पोरेट संस्था 18 वर्षांच्या वरील व्यक्ती कर्जासाठी पात्र आहे
तुम्ही ऑनलाइन अर्ज करणार असाल तर दोन पासपोर्ट साइज फोटो, ओळखीचा पुरावा - निवडणूक ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, वर्तमान नियोक्त्याने जारी केलेले फोटो ओळखपत्र, पासपोर्ट या पैकी कोणतेही एक ओरिजनल आणि ट्रू कॉपी दोन्ही जमा करणं आवश्यक आहे.
याशिवाय इतर कागदपत्रांची यादी तुम्ही बँकेच्या ऑनलाइन साईटवर जाऊन तपासू शकतो. तिथे अगदी सविस्तर माहिती तुम्हाला मिळू शकते.