होम लोन घेणं आणि तेही सरकारी बँकेकडून म्हणजे महादिव्य. ढिगभर डॉक्युमेंट आणि 100 खेटे घालण्याचं कटकट नको वाटते. अशावेळी मग खासगी बँकांकडे पावलं वळतात. मात्र आता निराश होण्याचं कारण नाही.
सरकारी बँक चक्क आता एका फोनवर लोन द्यायला तयार झाली आहे. नुकत्याचं एका ट्विटमधून बँकेनं ही माहिती दिली.
बँक ऑफ इंडियाने ट्विट करून याबाबत माहिती दिली. आता तुमच्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात घेण्याची संधी. फक्त लोनसाठी एक फोन करा आणि लोन घ्या असं म्हटलं आहे.
बँक ऑफ इंडियाने 8010968305 हा नंबर जारी केला आहे. यावर तुम्ही मिस्ड कॉल देऊन लोनसाठी अर्ज करू शकता.
तुम्ही SMS द्वारे देखील कर्जासाठी अर्ज करू शकता.<HL> लिहून 76669021290 या नंबरवर तुम्हाला पाठवायचं आहे.
तुम्हाला कमी इंटरेस्ट रेटमध्ये होमलोन या सरकारी बँकेकडून मिळू शकतं. त्यामुळे आता तुम्हाला बँकेत 100 खेटे घालण्याची आवश्यकता नाही असं बँकेनं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.