सर्वात सुरक्षित गुंतवणूक आणि कमी रिस्क म्हणजे फिक्स डिपॉझिट आहे. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आनंदाची बातमी आहे. खासगी बँकेनं व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
2 कोटींपेक्षा कमी किंमतीच्या फिक्स डिपॉझिटवर तुम्हाला आता 7 टक्क्यांहून अधिक व्याजदर मिळणार आहे. नवीन व्याजदरांनुसार, धनलक्ष्मी बँक 555 दिवस (18 महिने आणि 7 दिवस) FD वर सर्वाधिक 7.25 टक्के व्याज देत आहे.
बँक ज्येष्ठ नागरिकांना (धनम टॅक्स अॅडव्हांटेज डिपॉझिट वगळता) 0.50 टक्के वार्षिक दराने 1 वर्ष आणि त्यावरील सर्व घरगुती एफडीसाठी अतिरिक्त व्याज देत आहे.
7 ते 14 दिवसांत मुदतपूर्ती होणाऱ्या मुदत ठेवी आता 3.25% व्याजदर देत आहेत, तर धनलक्ष्मी बँक आता पुढील 15 ते 45 दिवसांत मुदतपूर्ती होणाऱ्या ठेवींवर 5.75% व्याजदर मिळणार आहे. बँक आता 46 दिवस ते 90 दिवसांच्या ठेवींवर 6.00% आणि 91 दिवस ते 179 दिवसांच्या ठेवींसाठी 6.25% व्याजदर देत आहे.
180 दिवस ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या ठेवींवर आता 6.50% व्याजदर मिळेल. तर, 1 वर्ष ते 2 वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर आता 6.75% व्याजदर मिळेल.
उदाहरणार्थ तुम्ही 50 हजार रुपये 555 दिवसांसाठी जर ठेवले तर तुम्हाला FD कालावधी पूर्ण झाल्यावर 55,808.77 रुपये परत मिळणार आहेत. 5,511.99 अधिक रक्कम मिळणार आहे. तुम्हाला 5 हजार रुपये फायदा होणार आहे.