मागील एका वर्षात बँकांच्या व्याज दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे बँकेत फिक्स्ड डिपॉझिट (FD) करणाऱ्या गुंतवणूकदारांना अतिशय कमी रिर्टन मिळतात. भारतीय स्टेट बँकेत एका वर्षाच्या डिपॉझिटवर 5.5 टक्के दराने व्याज मिळतं आहे. परंतु बजाज फायनान्स लिमिटेड आपल्या ग्राहकांना एफडीवर 6.60 टक्के दराने व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना यावर अतिरिक्त 0.25 टक्के फायदा मिळतो आहे.
बजाज फायनान्समध्ये 12 महिन्यांपासून 60 महिने अर्थात 5 वर्षांसाठीही एफडी करता येऊ शकते. बजाज फायनान्सच्या एफडीमध्ये, गुंतवणूकदार कमीत-कमी 25000 रुपयांची गुंतवणूक करू शकतात.
बजाज फायनान्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणं अतिशय सोपं आहे. ऑनलाईन प्रक्रियेअंतर्गत गुंतवणूकदार घरबसल्या गुंतवणूक करू शकतात.
बजाज फायनान्स एनआरआय, ओवरसीज सिटिझन ऑफ इंडिया आणि इंडियन ओरिजिन व्यक्तीलाही एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय देतात. यासाठी गुंतवणूकीचा कालावधी 12 महिने ते 36 महिन्यांपर्यंत असतो.
गुंतवणूकदारांकडे सिस्टेमॅटिक डिपॉझिट प्लॅन अंतर्गत (SDP) मासिक गुंतवणूकीचाही पर्याय आहे. SDP द्वारे गुंतवणूकदार दर महिन्याला एक छोटी रक्कम भरू शकतात. SDP द्वारे प्रत्येक महिन्याला डिपॉझिट होणाऱ्या रकमेचा कालावधी 12 महिने ते 60 महिन्यांपर्यंत असेल.
SDP द्वारे गुंतवणूकदार 6 ते 48 महिन्यादरम्यान, मासिक डिपॉझिटचा पर्याय निवडू शकतात. प्रत्येक महिन्याच्या डिपॉझिटवर जो व्याज दर असेल, तेच व्याज संपूर्ण कालावधीसाठी त्या डिपॉझिटवर कॅल्क्युलेट होईल. SDP द्वारे दर महिन्याला भरली जाणारी रक्कम एफडीप्रमाणेच मानली जाते.
जर एफडीवर महिन्याला व्याज हवं असल्यास, त्याचाही पर्याय निवडता येऊ शकतो. मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक आधारेही व्याज मिळवण्याची सुविधा आहे.
बजाज फायनान्स डेबिट कार्डद्वारेही एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा आहे.