ATM मधून पैसे काढण्याचे नियम 1 मे पासून बदलले आहेत. जर तुम्ही ते न वाचताच पैसे काढत असाल तर सावधान तुमचं नुकसान होऊ शकतं. तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.
ATM मधून पैसे काढणाऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. तुमच्या खात्यावर जर बॅलन्स कमी असेल आणि तुम्ही पैसे काढण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. तुमचं ट्रान्झॅक्शन फेल होताच दंड आकारला जाईल.
पंजाब नॅशनल बँकेनं हा ग्राहकांना मोठा दणका दिला आहे. ग्राहकांनी कोणत्याही ATM मधून कमी बॅलन्स असताना पैसे काढायचा प्रयत्न केला आणि ट्रान्झाक्शन फेल झालं तर दंड आकारण्यात येईल.
तुम्ही ATM मध्ये जात असाल तर आधी बॅलन्स चेक करू जा. म्हणजे हे नुकसान टाळता येईल. तुमचा आळस तुमच्या अंगाशी येऊ शकतो त्यामुळे ATM मधून पैसे काढताना जरा जपूनच काढा.
PNB इतर शुल्क देखील वाढविण्याचा विचार करत आहे. डेबिट कार्ड किंवा प्रीपेड कार्ड वार्षिक शुल्क आणि देखभाल शुल्क वाढेल.
PNB इतर शुल्क देखील वाढविण्याचा विचार करत आहे. डेबिट कार्ड किंवा प्रीपेड कार्ड वार्षिक शुल्क आणि देखभाल शुल्क वाढेल.
कमी बॅलन्स असेल आणि ट्रान्झॅक्शन फेल झालं तर 10 रुपये + GST चार्ज भरावे लागेल. याबाबत SMS द्वारे ग्राहकांना माहिती दिली जाणार आहे.