NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Airtel ग्राहकांना मोठा दणका! तुमचे प्री-पेड प्लॅन महागले, पाहा किती रुपयांना बसणार फटका

Airtel ग्राहकांना मोठा दणका! तुमचे प्री-पेड प्लॅन महागले, पाहा किती रुपयांना बसणार फटका

एअरटेल कंपनीने वाढवले रिचार्जचे प्लॅन, पाहा किती रुपये जास्त भरावे लागणार?

17

तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी बातमी खूप महत्त्वाची आहे. कंपनीने आपले प्लॅन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार 9 सर्कलमध्ये प्री-पेड रिचार्ज महाग झाले आहे.

27

या दरवाढीनंतर आता ग्राहकांना 99 रुपयांच्या रिचार्जसाठी 155 रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच आता ग्राहकांना एका रिचार्जवर 56 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.

37

वाढत्या महागाईमुळे कंपनीने हा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. कंपनीने रिचार्जचे दर वाढवले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला बजेटआधीच मोठी कात्री लागणार आहे.

47

भारती एअरटेलने आपल्या मिनिमम रिचार्जमध्ये या रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ केली आहे. दरवाढीच्या घोषणेनंतर आता ग्राहकांना कमीत कमी 155 रुपयांचे रिचार्ज करावा लागणार आहे.

57

यापूर्वी कंपनीने आपल्या 7 सर्कलमध्ये दरवाढ जाहीर केली होती, तर आता 2 सर्कलमध्ये वाढ करण्यात आली आहे. एकंदरीत, कंपनीने आपल्या 9 सर्कलमध्ये प्लॅनच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी कंपनीने ओडिशा आणि हरयाणामध्ये दरवाढ केली होती.

67

टेलिकॉम कंपन्यांना रिचार्ज प्लॅनची किंमत का वाढवावी लागते, हा प्रश्न आहे. खरं तर या क्षेत्रातील ३ पैकी २ कंपन्या नफ्यासाठी धडपड करत आहेत. विशेषत: व्होडाफोन-आयडिया कर्जाच्या प्रचंड ओझ्याखाली आहेत.

77

रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलची नेट डेट-टू-एबिटडा देखील तीन पटीने जास्त आहे. आर्थिक पातळीवर संघर्ष करूनही कंपन्या सातत्याने ५जी नेटवर्कमध्ये गुंतवणूक करत आहेत. स्पेक्ट्रमच्या लिलावानंतर जिओ आणि एअरटेल देशभरातील विविध भागात ५जी सेवा सुरू करत आहेत.

  • FIRST PUBLISHED :