तसे तुम्ही बरेच बकरे पाहिले असतील पण सध्या एक बकरा चर्चेत आला आहे. या बकऱ्याला पाहण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत. कृषी मेळाव्यात आणण्यात आलेल्या या बकऱ्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
शेरा असं या बकऱ्याचं नाव आहे. या बकऱ्याचा मालक सागरने सांगितलं, शेरा दोन वर्षांचा आहे. तो फळं, चारा आणि कच्च्या भाज्या खातो.
आता बकऱ्यात खास काय आहे, तर त्यांची उंची आणि किंमत. असे बकरे राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यातच आढळून येतात. यांचा आकार मध्य असतो. कान पानाच्या आकाराचे असतात. ज्यांचा आकार जवळपास 10 सेमी असतो.
शेराची उंची तीन फिट आहे. राजस्थानी प्रजातीचा असलेला हा बकरा खगडियाहून बिहार कृषी विश्वविद्यालयातील क्षेत्रीय शेतकरी मेळाव्यात आणण्यात आला.
याची किंमत अंदाजे 50 हजारांपर्यंत आहे. पण सागर या बकऱ्याला विकण्याच्या तयारीत नाही. पण जर चांगली किंमत मिळाली तर विकण्याची तयारी तशी त्याने दर्शवली आहे.