सोनिया मिश्रा/चमोली : फुलं आपल्याला प्रसन्न करतात. कोणतीही फुलं पाहिली की खूप छान वाटतं मन शांत होतं. याच फुलांनी शेतकऱ्यांचं नशीब पालटलं आहे.
पारंपरिक शेती न करता एका शेतकऱ्यानं फुलांची शेती करण्याचं आव्हान स्वीकारलं. या फुलांनी त्याच्या आयुष्यात आनंदाचे आणि सुखाचे रंग भरले.
शेतकऱ्याने इतर कोणत्याही फुलांची शेती करण्यापेक्षा लीलियमची शेती त्याने करण्याचा निर्णय घेतला. त्याने यासाठी सगळी माहिती काढली तेव्हा लक्षात आलं की सरकारही यावर 80 टक्के सब्सिडी देखील देतं.
मग काय कामच झालं की म्हणत शेतकऱ्याने या सब्सिडीचा फायदा घेऊन शेती केली. आज त्याला लाखो रुपयांचा फायदा यातून मिळत आहे.
उत्तराखंड जिल्ह्यातील चमोली इथे 20 शेतकऱ्यांनी 1200 वर्ग मीटरमध्ये पॉलीहाउस अंतर्गत 25 हजार लीलियम फुलांची रोपं लावली. 3000 स्टिक तयार करुन विकण्यात आली. या फुलांचं मार्केटिंग देखील अगदी उत्तम पद्धतीनं करण्यात आलं आहे.
लीलियमला एक औषधी गुणधर्म आहे. त्यामुळे या फूल झाडांची मागणी खूप जास्त असते. वात आणि पत्त दोषाच्या आजारांवर ही वनस्पती अधिक फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं.
उत्तराखडं सरकार 80 टक्के सब्सिडी देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वत: सरकार अशा प्रकारची सब्सिडी देत आहे.