NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Ahmadnagar News: प्रयोगशील शेतकऱ्याची कमाल, चक्क अहमदनगरमध्ये पिकवलं सफरचंद, पाहा Photos

Ahmadnagar News: प्रयोगशील शेतकऱ्याची कमाल, चक्क अहमदनगरमध्ये पिकवलं सफरचंद, पाहा Photos

अहमदनगरमधील प्रगतशील शेतकरी भारत गुंजाळ आपल्या शेतात विविध प्रयोग करत असतात. त्यांनी हिमालयातील सफरचंद आपल्या शेतात पिकवले आहेत.

  • -MIN READ

    Last Updated: March 16, 2023, 10:58 IST
110

कृषी प्रधान असणाऱ्या भारतात भौगोलिक रचना, हवामान यानुसार पीक पद्धती वेगवेगळी आहे. परंतु, आधुनिक पद्धतीने काही शेतकरी थंड प्रदेशातील पिकेही दुष्काळी भागात घेऊ लागले आहेत.

210

अहमदनगरमधील प्रगतशील शेतकरी भारत गुंजाळ यांनी असाच एक प्रयोग केला आहे. नेवासा तालुक्यातील रामडोह या गावात चक्क हिमालयातील सफरचंदाची शेती केली आहे.

310

भारत गुंजाळ यांनी सफरचंदाची रोपे हिमाचल प्रदेश मधून मागवली आहेत. रोपे आणण्यासाठी त्यांना प्रति रोप 125 रुपये एवढा खर्च आला.

410

एक एकर जमिनीत त्यांनी सफरचंदाची लागवड केली. शेतात 375 सफरचंदाची रोपे लावली आहेत.

510

लागवडीनंतर साधारण अडीच ते तीन वर्षांच्या कालावधीमध्ये संफरचंदाच्या झाडांना फळे लागली आहेत. सध्या एका झाडाला 70 ते 75 फळे आले आहेत.

610

बदलत्या काळानुसार सफरचंदाचे काही वाण हे 50 डिग्री सेल्सियसपर्यंतच्या तापमानातही जगू शकतात. आता उन्ह आणि पक्षांनी फळाचे नुकसान करू नये म्हणून फळांना प्लास्टिक आच्छादन करण्याचे काम सुरू आहे.

710

सफरचंदाची लागवड करण्यासाठी सरासरी तापमान 21 ते 24 अंश असणे गरजेचे आहे. या पिकाला चांगली फुले आणि फळ धारणा होण्यासाठी सुमारे 100 ते 125 सेंटीमीटर पर्जन्यमान असणे आवश्यक आहे.

810

अहमदनगरमधील ज्या भागात हे पीक घेतले जात आहे, तिथे वातावरण काही अंशी थंडच जाणवते. जायकवाडीच्या बॅक वॉटर हा पट्टा असल्याने वातावरणात गारवा असतो. येथील तापमान कमीत कमी 15° आणि जास्तीत जास्त 30° आहे.

910

भारत गुंजाळ यांनी जोखीम पत्करत आपल्या एक एकर शेत जमिनीत प्रायोगिक तत्त्वावर सफरचंद शेती सुरू केली. जायकवाडीच्या कुशीत वसलेल्या रामडोह येथे सफरचंद लागवड शक्य असल्याचे या प्रयोगातून समोर आले आहे.

1010

आता गुंजाळ यांचा सफरचंदाच्या शेतीचा नवखा प्रयोग सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरत आहे.

  • FIRST PUBLISHED :