NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / आधार-पॅन लिंक करण्यात तुम्हाला येते का अडचण? मग हे तपासून पाहा

आधार-पॅन लिंक करण्यात तुम्हाला येते का अडचण? मग हे तपासून पाहा

आधार पॅनकार्ड लिंक करण्यात तुम्हाला येतात का अडचणी, मग इथे चेक करा नेमकं काय चुकतंय?

17

पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2023 आहे. 1 एप्रिलनंतर तुम्ही लिंक केलं नसेल तर ते वैध राहणार नाही. तुम्ही लिंक करताना असं होऊ शकतं की आधार पॅन लिंक होत नाही. अशावेळी तुम्ही एकदा तपासून पाहा की दोन्हीकडे असलेली माहिती बरोबर आहे की नाही. पॅन किंवा आधार कार्डवरील माहिती जर चुकीची असेल तर लिंक करण्यात अडथळे येऊ शकतात.

27

आधारमधील माहिती पॅनच्या डेटा रिपॉजिटरीमधील नागरिकाचे नाव, स्पेलिंग, जन्मतारीख, लिंग या गोष्टी जुळत नसतील तर लिंक होऊ शकणार नाही. आधार क्रमांकाचा चुकीचा उल्लेख असू शकतो. अशा परिस्थितीत पॅन किंवा आधारची माहिती दुरुस्त करावी.

37

आता ई-फायलिंग पोर्टलवरच एक लिंक उपलब्ध आहे. तेथून पॅन किंवा आधारमध्ये दुरुस्ती करावी लागेल. लिंक आधार टॅब अंतर्गत, तुम्हाला लिंक्स टू करेक्ट नेम नावाचा विभाग दिसेल. तिथे क्लिक केल्यावर तुम्हाला दोन लिंक पर्याय मिळतील - एक आधार दुरुस्तीसाठी आणि दुसरा पॅनसाठी. तुम्हाला तुमच्या गरजेनुसार लिंक निवडावी लागेल.

47

ई फाइलिंग पोर्टलमध्ये आधार पॅनकार्ड दोन्ही तपासून पाहा. कोणत्याही एकामध्ये चूक असेल तरी त्रास होऊ शकतो. तुम्ही आधार किंवा पॅन जे चुकलंय त्यात बदल करू शकता. लिंक्स टू करेक्ट नेम नावाचा एका सेक्शन असेल, तिथे तुम्हाला दोन पर्याय उपलब्ध होतील. एक सुधारणा आणि दुसरा पॅनकार्डसाठीचा पर्याय असेल. तुम्ही गरजेनुसार पर्याय निवडू शकता.

57

जर तुम्ही माहिती अपडेट केली असेल तर तुम्हाला बँक, म्युच्युअल फंडसह इतर ठिकाणी देखील ही माहिती अपडेट केल्याची नोंद करावी लागणार आहे. याचं कारण म्हणजे आधार पॅन सगळीकडे आता लिंक करायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला हे करणं बंधनकारक आहे. पॅनकार्डमध्ये बदल करण्यासाठी 107 रुपये शुल्क भरावे लागते. डिमांड ड्राफ्ट, क्रेडिट, डेबिट किंवा नेट बँकिंगद्वारे देखील पेमेंट करता येतं. https://tin.tin.nsdl.com/pan/correctiondsc.html तुम्हाला या लिंकवर क्लीक करायचं आहे.

67

प्रत्येक व्यक्ती आपल्याला हवं तर आपल्या आधारकार्डची माहिती मिळवू शकते. ऑनलाईन तुम्हाला तुमच्या आधारचे सगळे डिटेल्स मिळू शकतात. याशिवाय तुम्ही आधार केंद्रावर जाऊन देखील माहिती मिळवू शकता. तुम्ही आधार कार्डच्या पोर्टलवर जाऊन लॉगइन करा. तुम्हाला तुमचा पत्ता, नाव जे अपडेट करायचं ते करू शकता.

77

आवश्यक असल्यास https://uidai.gov.in/images/mou/uidai_data_update_policy_ver_2.3.1.pdf या लिंकवर क्लिक करा

  • FIRST PUBLISHED :