NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Aadhar Pan Card Link : आधार पॅन आताच लिंक करा नाहीतर 10 हजारांचा दंड भरा

Aadhar Pan Card Link : आधार पॅन आताच लिंक करा नाहीतर 10 हजारांचा दंड भरा

पुढच्या महिन्याची वाट कशाला बघता, आजच पूर्ण करा हे काम नाहीतर भरावा लागेल 10 हजारांचा दंड

15

मुंबई : तुम्ही पुढच्या महिन्याची वाट कशाला बघत आहात. आजच काम उद्यावर टाकणं तुम्हाला महागात पडू शकतं. कारण तुमच्याकडे फक्त काही दिवस शिल्लक आहेत. तुम्ही अजूनही आधार पॅन लिंक केलं नसेल तर अजूनही संधी गेली नाही. आताच लिंक करुन घ्या.

25

31 मार्च अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर तुमचं पॅनकार्ड कचऱ्यात फेकण्याच्या लायकीचं होईल. तो केवळ एक प्लॅस्टिकचा कागद उरेल. जर तुम्हाला तसं करायचं नसेल तर तुम्ही आताच आधार पॅन कार्डशी लिंक करुन घ्या. तुम्हाला 1000 रुपये दंड भरून आता ते करता येणार आहे.

35

31 मार्चनंतर जर तुम्ही पॅनकार्ड लिंक करायला गेलात तर तुम्हाला 10 हजार रुपये दंड भरावा लागेल. आयकर विभागाने सोशल मीडियावर आणि त्यासोबत मोबाईल नंबरवर देखील ग्राहकांना वारंवार आठवण करुन देत आहे. आता या कामासाठी पुढील महिन्याच्या ३१ तारखेपर्यंतच अवधी शिल्लक आहे.

45

जर तुम्ही अद्याप तुमचा पॅन आधारशी लिंक केला नसेल, तर शेवटच्या तारखेची वाट पाहू नका आणि हे काम त्वरित पूर्ण करा. कारण जर पॅन बंद झालं तर तुम्ही आयकर भरु शकणार नाही. याशिवाय तुमची बँकेची काही कामं अडू शकतात. त्यामुळे तुम्ही वाट पाहू नका.

55

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने 30 जूनपासून आधारला पॅनशी लिंक करण्यासाठी 500 रुपयांऐवजी 1000 रुपयांचा दंड निश्चित केला आहे. प्राप्तिकर कायदा 1961 नुसार पॅनला आधारशी लिंक करणे आवश्यक आहे.

  • FIRST PUBLISHED :