NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / महिन्याला 10 हजाराच्या SIP चे रूपांतर 5 वर्षात 12 लाखात करणारे 3 म्युच्युअल फंड

महिन्याला 10 हजाराच्या SIP चे रूपांतर 5 वर्षात 12 लाखात करणारे 3 म्युच्युअल फंड

आर्थिक तज्ज्ञांनुसार इक्विटी म्युच्युअल फंडाचा अधिकाधिक फायदा मिळवण्याचा मार्ग म्हणजे त्यात दीर्घकालीन राहणे आणि चक्रवाढीचा फायदा घेऊन तुमची गुंतवणूक दुप्पट करणे. आम्ही तुम्हाला अशा 3 म्युच्युअल फंडांबद्दल सांगणार आहोत जे 5 स्टार रेट आहेत. यात 10,000 रुपयांची एसआयपी 5 वर्षांत 12 लाख रुपयांत बदलली आहे. या तीन फंडांची नावे आहेत- क्वांट अॅक्टिव्ह फंड डायरेक्ट ग्रोथ, क्वांट मिड कॅप फंड डायरेक्ट ग्रोथ, पीजीआयएम इंडिया मिडकॅप फंड डायरेक्ट ग्रोथ.

13

क्वांट अॅक्टिव्ह फंड डायरेक्ट ग्रोथ- हा फंड 1 जानेवारी 2013 रोजी सुरू झाला. मॉर्निंगस्टारने याला 5 स्टार रेटिंग दिले आहे. 30 जून 2022 पर्यंत फंडाची मालमत्ता अंतर्गत व्यवस्थापन (AUM) रु. 2,644 कोटी आहे. त्याचा बेंचमार्क निफ्टी 500 मल्टीकॅप आहे. तर सरासरी वार्षिक ग्रोथ 21.08 टक्के आहे आणि गेल्या एका वर्षात 14 टक्के परतावा दिला आहे. जर 5 वर्षांपूर्वी 10,000 रुपयांची एसआयपी सुरू केली असती, तर आज ही रक्कम 12.72 लाख रुपये झाली असती. या पाच वर्षांत फंडाने वार्षिक 30.62 टक्के परतावा दिला आहे.

23

क्वांट मिड कॅप फंड डायरेक्ट ग्रोथ- हा फंड देखील 1 जानेवारी 2013 रोजी सुरू झाला. 9 सप्टेंबरपर्यंत त्याची AUM रु. 621 कोटी आहे. फंडाने गेल्या एका वर्षात 23.65 टक्के परतावा दिला आहे तर स्थापनेपासूनचा वार्षिक सरासरी परतावा 17.46 टक्के आहे. याने 5 वर्षात 30.97 टक्के वार्षिक परतावा दिला आहे, त्यामुळे या कालावधीत फंडाने रु. 10,000 च्या SIP चे रूपांतर 12.83 लाखात केले असते.

33

पीजीआयएम इंडिया मिडकॅप अपॉर्च्युनिटीज फंड डायरेक्ट ग्रोथ - 2 डिसेंबर 2013 रोजी लाँच झालेल्या या 5 स्टार फंडाची 30 जून 2022 रोजी 6614 कोटी रुपयांची AUM होती. त्याचा बेंचमार्क निफ्टी मिडकॅप 150 आहे. फंडाने गेल्या 5 वर्षांत 31.40 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. जर एखाद्याने या कालावधीसाठी 10,000 रुपयांची एसआयपी सुरू केली असेल, तर त्याला आतापर्यंत 12.96 लाख रुपये मिळाले असते.

  • FIRST PUBLISHED :