मुंबई : राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. अजूनही संपूर्ण महाराष्ट्रात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही, त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. दरम्यान पुढचे 48 तास राज्यात कसं असेल हवामान याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 4,5 दिवसात कोकणात जोरदार पावसाचा अंदाज आहे.
राज्याच्या आतल्या भागात मध्यम पावसांची शक्यता. पुढच्या 2 दिवस विदर्भातही मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
गेल्या 24 तासात विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाउस झाला. IMD ने जुलैसाठी वर्तवलेला हंगामी अंदाज महाराष्ट्राच्या काही भागांसह मध्य भारतात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता दर्शवत आहे.
पुढील दोन दिवस पावसाच्या दृष्टीनं चांगले राहतील असाही अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.