मुंबई, ठाणे, नवी मुंबई भागात पावसाची रिपरिप सलग सुरूच आहे, तर उपनगरांमध्ये धो धो पाऊस पडत आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. तर दुसरीकडे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे.
आज कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.
3, 4 आणि 5 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात 5 जुलै रोजी मध्यम स्वरुपाचा पाऊस राहील. या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
3, 4 आणि 5 जुलै रोजी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरात मात्र यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पुढचे तिन्ही दिवस पाऊस मध्यम स्वरुपाचा राहील, पावसामुळे वाहतूक धीम्या गतीनं सुरू असल्याने वेळेचं नियोजन करुन बाहेर पडा.