NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Wardha News : तिसरीतील 'अर्णवी'चा पराक्रम; सलग 3 तास 39 मिनिटं नृत्य; इंडिया बुक ऑफ रेकार्डसमध्ये नोंद

Wardha News : तिसरीतील 'अर्णवी'चा पराक्रम; सलग 3 तास 39 मिनिटं नृत्य; इंडिया बुक ऑफ रेकार्डसमध्ये नोंद

Wardha News : वर्धेतील तिसर्‍या वर्गात शिकणार्‍या 8 वर्षांच्या अर्णवी सागर राचलवार या चिमुकलीने आज (रविवार 4 जून) सलग 3 तास 39 मिनिटं भरतनाट्य या नृत्य प्रकारात नृत्य करून इंडिया बुक ऑफ रेकार्डवर नाव कोरलं आहे. (नरेंद्र मते, प्रतिनिधी)

18

अर्णवीचा यापुर्वीचा रेकार्ड फक्त 49 मिनिटांचा होता. इंडिया बुक ऑफ रेकार्डचे परीक्षक तत्त्वावादी यांनी अर्णवीला प्रमाणपत्र देऊन इंडिया बुक ऑफ रेकार्डसमध्ये नोंद झाल्याचे जाहीर केले.

28

येळाकेळी येथील चन्नावार इ विद्या मंदिरमध्ये शिकणार्‍या अर्णवीने वयाच्या तिसर्‍या वर्षापासूनच भरतनाट्यम शिकण्याला सुरुवात केली. या पाच वर्षात तिने जिल्हा, राज्यस्तरीय, राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय असे 137 परितोषिक, पुरस्कार व बक्षिसं पटकावले आहेत.

38

आज सावंगी मेघे येथील दत्ता मेघे सभागृहात आयोजित इंडिया बुक ऑफ रेकार्डसाठी तिने 10 वाजून 39 मिनिटांनी सुरुवात केली. पहिल्या एक तास सलग नाट्य सादर करून यापूर्वीचा विक्रम तिने मोडून काढला. त्यानंतर तिने स्वयंस्फुर्तीने पुन्हा रंगमंचावर अवतरत 3 तास 39 मिनिटांचा विक्रम केला.

48

तिने लघुपट व अल्बममध्येही बालकलाकारांची भुमिका सादर केली आहे. यापूर्वी 2020 मध्ये रशिया आणि दुबई येथे नृत्य स्पर्धेसाठी अर्णवीची निवड झाली आहे.

58

मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड, लॅम्बडा लिट्ररी अवार्ड, हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्काराची मानकरीही ती ठरली आहे. तिला सचिन डंबारे यांनी भरत नाट्यसाठी मार्गदर्शन केले.

68

सुरुवातीला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, प्रसिद्ध बाल रोग तज्ज्ञ व वैद्यकीय जन जागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी तिला शुभेच्छा दिल्या.

78

चन्नावार इ विद्यालयचे अध्यक्ष दिनेश चन्नावार, जिपच्या माजी अध्यक्ष वैशाली येरावार, डॉ. स्मीता पावडे यांनी तिला शुभेच्छा दिल्या. कोराना काळात तिने घरीच भरतनाट्याचा सराव सुरू केला.

88

गेल्या काही महिन्यांपासुन ती दररोज 1 तास सराव करीत होती, अशी माहिती अर्णवीची आई दीपाली राचर्लावार यांनी दिली.

  • FIRST PUBLISHED :