नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथी कोल्हार नदीत अस्थि विसर्जनासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे.
सरवरे कुटुंबातील (रा. अजनी, बाबूलखेडा) येथील मृत महिलेची अस्थि विसर्जन करताना ही घटना घडली.
एकाला वाचविण्याचा नादात शनिवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास ही घटना घटली. आकाश राऊत, सानू हेडकर आणि हर्षिद यादवण अशी मृतांची नाव आहेत. मृत तिघे नागपूर येथील राहणारे होते.
सरवरे कुटुंब अजनी बाबूलखेडा येथून कोल्हार नदीवर अस्थि विसर्जनासाठी आलं होतं. यादरम्यान तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला झाला
तिघांचे मृतदेह सापडले आहेत. एकाला वाचवण्याच्या नादात तिसऱ्याचा जीव गेल्याची माहिती समोर आली आहे.