NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / लातूरचा MBA वाला विकतोय 100 रुपयांमध्ये साडी, पाहा कुठे आहे खरेदीची संधी PHOTOS

लातूरचा MBA वाला विकतोय 100 रुपयांमध्ये साडी, पाहा कुठे आहे खरेदीची संधी PHOTOS

साडी हा प्रत्येक महिलेचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. लातूरचा एमबीए झालेला तरुण 100 रुपयांमध्ये साडी विकत आहे.

18

साडी हा प्रत्येक महिलेचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यातच जर कोणी 100 रुपयात साडी विक्री करत असेल तर त्या दुकानामध्ये महिलांची मोठी गर्दी होते.

28

कल्याणमधील एका ठिकाणी चक्क 100 रुपयांपासून साड्या मिळतायत. त्याचबरोबर अन्य साड्याही कमी किंमतीमध्ये घेण्याची संधी इथं उपलब्ध आहे.

38

मुळचे लातूरचे असलेले शिवराज यांनी एमबीएपर्यंतचं शिक्षण घेतलंय. नोकरी केल्यापेक्षा व्यवसाय करण्याची त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी कल्याणमध्ये शॉप सुरू केले आहे.

48

अनेक महिला घरकाम करताना आजही साड्या नेसतात. घरकाम करताना सातत्याने वापर झाल्यानं साड्या खराब होतात. त्यामुळे साध्या साड्या वापराव्या लागतात. त्याचबरोबर गरीब घरातील महिलांनाही महागडी साडी खरेदी करणे शक्य नसते.

58

या सर्वांसाठी कल्याणमधील न्यू टेक्सटाइल मार्केटमध्ये 100 रुपयांपासून साड्या उपलब्ध आहेत, अशी माहिती या दुकानाचे मालक शिवराज पाटील यांनी दिली.

68

नेहमीच्या वापरातील साध्या साड्यांप्रमाणेच कांजीवरम, पैठणी, पेशवाई, सेमी पैठणी, ऑर्गेंझा, गार्डन या साड्या देखील इथं खरेदी करता येतात.या सर्व साड्या येवला, सुरत, मध्यप्रदेश आणि कर्नाटकमधून आम्ही मागवतो, असं त्यांनी सांगितलं.

78

काही महिलांना रंग तर काही महिलांना डिझाईन आवडते. सध्या इंग्लिश कलर घेण्याकडे महिलांचा कल अधिक आहे. विशेष म्हणजे काठ पदर साड्या घेतानाही बारीक काठ, जाड काठ पदरावरील डिझाईन नेमकी कशी आहे हे सर्व पाहूनच महिला खरेदी करत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

88

साड्यांची खरेदी न्यू टेक्सटाइल मार्केट, वेद हॉस्पिटल जवळ, कल्याण भिवंडी रोड , कल्याण (प) वेळ - सकाळी 10 ते रात्री 9.30 या वेळेत करता येईल.

  • FIRST PUBLISHED :