शहापूर (Shahapur)तालुक्यातील वेहळोली आसनगाव फाटा येथे एस.के.आय. कंपनीला (S.K.I. Company) भीषण आग लागली आहे.
आज पहाटेच्या सुमारास आग लागली असून अजूनही आग धुमसत आहे.
घटनेची माहिती मिळताच भिवंडी, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहे
आगीचे कारण समजू शकले नाही, परंतु, आग मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे
आगीत कंपनीचा बराच भाग भक्षस्थानी सापडला आहे.
या दुर्घटनेत अद्याप कोणतेही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
आगीने प्रचंड रौद्ररुपधारण केले आहे. धुराचे लोट शहरात दूरपर्यंत दिसून येत आहे
गेल्या काही दिवसांपासून भिवंडीत गोदाम आणि कंपन्यांना आग लागल्याच्या घटना वारंवार घडत आहे.