गुढीपाडवा निमित्त जगभरातील विठू-रखूमाईच्या भक्तासांठी मंदिर समितीची आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे
गुढीपाडवा हा सन साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने सर्व विठ्ठल भक्तांसाठी महत्त्वाचा दिवस समजला जातो.
विठ्ठल -रखुमाईच्या भक्तांसाठी आजच्या या दिवशी शेवंती, झेंडू, अश्टरच्या, जरबेरा, कामिनी व गुलाब फुलांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक आरास केली आहे.
विठूरायाचा आणि रुक्मिणी मातेचा गाभारा, सभामंडप, मंदिरातील खांब या सर्व ठिकाणी आकर्षक फुलांच्या माळाची सजावट केली आहे.
पुण्याचे विठ्ठल भक्त श्री नानासाहेब दिनकरराव पाचनकर यांच्याकडून ही मंदिर सजावट करण्यात आली आहे.
आकर्षक फुलांची सजावट विठ्ठल-रखुमाईच्या जगभरातील भाविकांसाठी आपल्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे.
पंढरपूरचे विठोबा मंदिर हे कोट्यवधी भाविकांचं आराध्य दैवत तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत असल्याने विठ्ठलाचे प्रसिद्ध मंदिर आहे.