सोलापूरमध्ये मध्यरात्री शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारुढ पुतळ्यास शिवनेरी किल्याचे ऐतिहासिक असे शिवकालीन रुप देण्यात आले होते.
पाळण्यातील शिवबांना सोलापूरकरांनी वंदन केले. यावेळी संपूर्ण परिसरात शिवकाळ अवतरला होता.
सोलापूरकरांनी या कार्यक्रमाचे फोटो मोबाईलमध्ये टिपले. छत्रपतींचा पाळणा सोहोळ्याचा फोटो काढण्यासाठी एक शिवप्रेमी चक्क खांद्यावर चढला होता.
पाळणा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या छोट्या शिवबाला त्याच्या आईनं कडेवर घेतले होते.
शिवरायांच्या वेशातील एका चिमुकल्या शिवबानं चक्क खांद्यावर बसून तलवार फिरवीत सर्वांचं लक्ष वेधलं.
'तुमचं आमचं नातं काय ? जय जिजाऊ … जय शिवराय' या घोषणा देत महिलांनी सोलापूरकरांमध्ये चैतन्य निर्माण केलं.
सोलापूर महापालिका आयुक्त शितल उगले-तेली तसेच शहिदांच्या वीरमाता , वीरपत्नींच्या हस्ते पाळणा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला शहरातील मुस्लीम महिलाही मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश सोलापूरकरांनी यावेळी दिला.