NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Sangli News: राजवाडा नव्हे ही तर शाळा, पाहा सांगलीतील मुलींचा कसा आहे थाट, Photos

Sangli News: राजवाडा नव्हे ही तर शाळा, पाहा सांगलीतील मुलींचा कसा आहे थाट, Photos

सांगली जिल्ह्यातील समडोळीच्या जिल्हा परिषद शाळेला राजवाड्याचं रुप देण्यात आलंय. जुन्या वाड्यात भरणारी ही शाळा आनंददायी शिक्षणाचं केंद्र ठरतेय.

  • -MIN READ

    Last Updated: March 15, 2023, 12:50 IST
115

ऑनलाइनच्या जमान्यात सध्याच्या पिढीला महाराष्ट्राचा खरा इतिहास माहीत आहे का? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यातच खाजगी शिक्षण संस्थांमुळे हायटेक शिक्षण ही संकल्पना सध्या भुरळ घालते आहे.

215

महाराष्ट्राच्या लढवय्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा विद्यार्थ्यांना विसर पडू नये, यासाठी चक्क शाळेचा राजवाडा बनवला आहे.

315

सांगली जिल्ह्यातील समडोळीच्या ग्रामस्थांनी मुलींच्या जिल्हा परिषद शाळेचं रूपडंच पालटलं आहे.

415

शिक्षणाने माणसाचा कायापालट होतो. जर ज्ञानदान करणाऱ्या शाळांचा कायापालट झाला तर शिक्षणाला नवा आयाम मिळू शकतो.

515

समडोळी येथील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेला राजवाड्याचे स्वरूप देण्यात आले आहे. रूपडे पालटलेली ही शाळा सध्या लक्षवेधी ठरत आहे.

615

मुलींना आनंददायी वातावरणात शिक्षण घेता यावे यासाठी समडोळी येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेला शैक्षणिक राजवाड्याचे रूप देण्यात आले आहे.

715

कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये शाळा बंद होती. मुलींनी पुन्हा शाळेत आनंददायी शिक्षणासाठी यावे म्हणून जुन्या वाड्यात भरणाऱ्या शाळेला राजवाड्याचं रूप देण्याचा निर्णय घेतला.

815

शाळेला शैक्षणिक राजवाड्याचे रूप देण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेतला. ग्रामस्थांनीही चांगली साथ दिली आणि शाळेचा राजवाडा झाला.

915

मुंबईचे प्रख्यात चित्रकार चंद्रकांत सुतार यांच्या कुंचल्यातून आणि शिक्षकांच्या संकल्पनेतून शाळेत सध्या रंगकाम झाले आहे.

1015

शाळेच्या प्रत्येक भिंतीवर चित्रातून सामाजिक, ऐतिहासिक, भौगोलिक संदर्भ मांडला जात आहे.

1115

शाळेच्या भिंतींवर ऐतिहासिक प्रसंग, मावळे, शस्त्रास्त्रे चितारण्यात आली आहेत.

1215

मुलींना भारतातील कर्तृत्ववान स्त्रियांची ओळख व्हावी यासाठी भिंतींवर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांची त्रिमिती चित्रे रेखाटली आहेत.

1315

चित्रे रेखाटताना विद्यार्थिनींमध्ये जिज्ञासा निर्माण व्हावी आणि त्यातून शिक्षण व्हावे, असा प्रयत्न केला आहे.

1415

शाळेतील प्रत्येक वर्गात बैठकीसाठी उत्तम मॅट, ई लर्निंगसाठी स्मार्ट डिजिटल बोर्ड, प्रोजेक्टरची सोयही उपलब्ध केली आहे.

1515

शाळेच्या भिंतीवरील जिवंत आणि त्रिमितीय चित्रे शिक्षणात नवा रंग भरत आहेत.

  • FIRST PUBLISHED :