सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात भाटवाडी येथे उदमांजराची शिकार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
वाळवा तालुक्यातील मौजे भाटवाडी येथे उद मांजराच्या शिकारीसाठी आलेल्या सहा जणांना वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
सदर माहिती मिळताच वनक्षेत्रपाल महंतेश बगले, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक दिपाली सागावकर, अमोल साठे यासह वनमजूर अनिल पाटील हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
घटनास्थळी पाहणी करत असताना संशयितांना सुगावा लागताच चारचाकी गाडीतून पळून जात असताना पकडले. गाडीची झडती घेतली असता, गाडीच्या शीट खाली लपवून ठेवलेला उदमांजर (इंडियन स्मॉल सिवेट) शोधून काढला.
सदर परिसरातून एकुण 6 संशयीत आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील 1 मृत उद मांजर,1 वाघर, 1 बॅटरी, 1 अल्टो कार, 1 दुचाकी गाडी इत्यादी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घटनास्थळाचा पंचनामा व इतर कागदपत्रे तयार करुन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.