गेल्या काही काळापासून देशात गॅस सिलेंडरचे दर सातत्याने वाढत आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.
गॅस दरवाढीच्या विरोधात देशात प्रतिक्रिया उमटत आहेत.
सांगलीतही दर वाढीच्या विरोधात प्रतिकात्मक आंदोलन झाले.
सांगलीतील मदनभाऊ युवा मंचने गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली.
स्मशानभूमित गॅस सिलेंडरचा विधिवत प्रतिकात्मक अंत्यविधीही पार पाडला.
सांगलीतील अमरधाम स्मशानभूमीमध्ये हा अंत्यविधी झाला.
आंदोलकांनी गॅस सिलेंडरचा माती सावडण्याचा कार्यक्रमही करून सरकारचा निषेध नोंदवला.
गॅस दर वाढल्यामुळे गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे महिलांमध्ये संतापाची भावना आहे.
पूर्वी घरगुती वापराच्या सिलेंडरवर मिळणारी सबसिडीही आता बंद झाली आहे.
गॅस दरवाढीमुळे जनतेला मोठा आर्थिक भार सहन करावा लागत आहे.
सध्या घरगुती गॅस सिलेंडरचा दर 1110 रुपये आहे.
व्यवसायिक सिलेंडरही महागला आहे. त्यामुळे खाद्य पदार्थांच्य किमतीतही वाढ होत आहे.
गॅस दरवाढीच्या विरोधातील प्रतीकात्मक आंदोलनाची सांगलीत चर्चा सुरू आहे.
मदनभाऊ पाटील युवा मंचाचे अध्यक्ष आनंद लेंगरे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हे अनोखं आंदोलन केलं.
प्रतिकात्मक आंदोलनातून महागाईकडे सरकारचं लक्ष वेधलं.
यावेळी महिलांनी सुद्धा आंदोलनात सहभाग घेत सरकारच्या विरोधात शंखध्वनी केला.