NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / दुष्काळी जतमध्ये काश्मिरच्या सफरचंदाची बाग, पाहा कशी केली शेतकऱ्यानं कमाल! Photos

दुष्काळी जतमध्ये काश्मिरच्या सफरचंदाची बाग, पाहा कशी केली शेतकऱ्यानं कमाल! Photos

सांगली जिल्ह्यातील जत तालुका बारमाही दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. येथील प्रयोगशील शेतकरी काकासाहेब सावंत यांनी सफरचंदाची बाग फुलवली आहे.

  • -MIN READ

    Last Updated: February 21, 2023, 11:51 IST
112

सांगली जिल्ह्यातील जत तालुका बारमाही दुष्काळी पट्टा म्हणून ओळखळला जातो. कमी पर्जन्यमानामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

212

पाण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला होता. तेव्हा राज्यभर जत तालुक्याची चर्चा झाली होती.

312

आता याच दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्याने केलेल्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा आहे. काश्मीरमधील नंदनवन समजले जाणारे सफरचंद जतमध्ये पिकवले आहे.

412

जत तालुक्याच्या अंतराळ येथील काकासाहेब सावंत हे एक प्रयोगशील शेतकरी आहेत. काही वर्षांपासून त्यांच्या मनात आपल्या शेतीत सफरचंदाची लागवड करण्याचे विचार सुरू होते.

512

सफरचंद लागवडीसाठी थंड हवामान लागते. त्यामुळे त्यांनी हिमाचल प्रदेशात जावून सफरचंदाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा केली.

612

सावंत यांनी सुरुवातीला हिमाचल प्रदेशातून 'हरमन 99' या वाणाची 150 रोपे आणली. त्याची एक एकरात लागवड केली.

712

कडक उन्हामुळे यातील 25 रोपे काही दिवसातच मरून गेली. पण, योग्य ती काळजी घेतल्यानंतर यातील 125 रोपे जगली.

812

या भागात पाणी कमी असल्याने ठिबकच्या माध्यमातूनच त्यांनी या रोपांना पाणी आणि काही आवश्यक खतांचे डोस दिले. तसेच शेणखताचाही वेळोवेळी वापर केला.

912

लागवड करून दोन वर्षे झाल्यानंतर आता प्रत्येक झाडाला 30 ते 40 सफरचंद लागली आहेत. एकेका सफरचंदाचे वजन 100 ते 200 ग्रॅम इतके आहे.

1012

सध्याच्या बाजारभावाचा विचार करता एका झाडापासून त्यांना 600 ते 1600 रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. तर संपूर्ण बागेतून 75 हजार ते दोन लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.

1112

सावंत यांच्या बागेतील सफरचंदामध्ये आणि हिमाचल प्रदेशातून येणाऱ्या सफरचंदामध्ये काहीही फरक दिसून येत नाही. लालभडक रंग, फळाची गोडी आणि वाससुद्धा एकसारखाच आहे.

1212

सावंत यांच्या या अभिनव प्रयोगामुळे जम्मू-काश्मिरप्रमाणेच आता सावंत यांच्या भोंड्या माळावरही सफरचंदाची बाग डौलाने डोलू लागली आहे. जिद्द आणि चिकाटीला अभ्यासाची जोड दिली तर जतसारख्या खडकातूनही सोने पिकवता येते, हे सावंत या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे.

  • FIRST PUBLISHED :