सांगली शहरातील सांगली मिरज रोडवर रिलायन्स या सोने चांदीच्या शोरूम वर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
शोरूम मधील सोन्या चांदीचे दागिने लुटून नेल्याची घटना घडली आहे. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
यामध्ये चोरट्याने फायरिंग सुद्धा केल्याचे समजते. यामध्ये एक ग्राहक जखमी झाल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि विश्रामबाग पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दरोड्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. यानंतर घटनास्थळावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
घटनेनंतर शोरूमच्या मालकाला अश्रू अनावर झाले.